पान:लोकहितवादी.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वाध्याय. 'पूर्वांच्या लेखांत जो अस्पष्ट, अफूट, अशा रीतीने दिसत असे त्याला "साध्यायां"त व्यक्त स्वरूप आलेले आहे. गोपाळरावांच्या सामाजीक, धार्मीक, राजकीय मतांची परिणती या पुस्तकांत झालेली आहे असे म्हणावयाला हरकत नाही. म्हणून थोडक्यांत या मतांचाआशय काय आहे ते सांगतो.. "आर्य लोकांच्या शास्त्रांत स्वाध्याय करावा असे लिहिले आहे व हे कर्म नित्य आहे म्हणजे प्रतिदिवशी केले पाहिजे. वेदवेदांगांचें दररोज सार्थ अध्ययन करणे याचे नांव स्वाध्याय. याला ब्रह्मकर्म असेंही म्हणतात. ब्रह्मकर्मास ब्रह्मचर्य आवश्यक आहे. परंतु हल्लींच्या हिंदू समाजाने आचार सोडला, लोक स्वेच्छ व असन्मार्गी झाले, म्हणून प्रजा दुर्बल, क्षीण होऊ लागल्या. देशांत वाईट चालीरीतींचा बुजबुजाट झाल्यामुळे देशावर प्रीती करावी असेंही कोणास वाटत नाहीं; व जोपर्यंत स्त्रियांची विटंबना, जातीभेद असे प्रकार लोक चालू देतात तोपर्यंत देशावर प्रीती करा असे सांगणेही निरर्थक आहे. झाड मोठ्या जोमाने वाढून त्याचा चांगला विस्तार व्हावा, त्याची छाया लांबवर जाऊन तिचा लोकांस उपयोग व्हावा आणि त्यास चांगली फळे येऊन त्यांचा सर्वांस उपभोग मिळावा अशी इच्छा करणाराने त्या वृक्षाचे बीजारोपण जर खडकावर केले तर त्याचे हेतू कितीसे सिद्ध होतील ? त्याचप्रमाणे लोकांनी देशावर प्रीती करावी अशी इच्छा असल्यास प्रथमतः स्वदेश वृक्षाची चांगली जोपासना करण्याकरितां त्याजमध्ये असणाऱ्या अविचारजन्य चालीरूढीरूप घातूक मुळ्या, सद्विचाररूपी कोयत्याने समूळ खणून काढिल्या पाहिजेत; व त्यास सत्संगजीवनाने व सद्विद्यांच्या खताने चांगली पुष्टी दिली पाहिजे म्हणजे आपोआपच त्याच्या योग्य काळी त्यास देशप्रीतीरूपी फळांचा बहर येईल. सारांश, प्रीती करण्याविषयी लोकांच्या सांगण्याची आव