पान:लोकहितवादी.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कर्तबगारीचा कोंडमारा. 'शिवाचा अवतार प्रगटला आहे !' वर्षातून सहा महिने याखाली जावयाचे. कोपरगांव ही पूर्वी बाजीच्या कैदेची जागा होती, तेथे व पंढरपूर,नाशीक इतके ठिकाणी बाजीरावाची स्वारी वर्षास जावयाची. ह्याप्रमाणे ह्यांत सहा महिन्यांचा काळ जात असे. एकंदर राज्यकारभाराच्या नांवानें शून्य ! फार तर काय ? पण दौतलेखणीही वाड्यांत मिळावयाची नाहीं ! ज्याला काम असेल त्याला भेट व्हावयाची नाही! बायकांचे हातून सर्व कारभार चालावयाचा. सदाशीव माणकेश्वर व चिंतो वामन देशमूख यांचे घरी जाऊन मक्तयाने मामलती वगैरे घ्याव्या. त्यांत सरकारास पैसा मात्र पुष्कळ भरावा लागे. सर्व खर्चात जेवणाचा खर्च काय तो मोठा. ब्राह्मणांस संतुष्ट करण्याकरिता मोठाली दाने देत. फौजफांटा, पागा, हजुरात, सरदार, मुत्सद्दी वगैरे यांस पैसा मिळावयाचा नाहीं; याप्रमाणे स्थिती होती ! सर्व सरदारांशी द्वेष असे. कारण की, ते नाना फडणविसाचे कारकीर्दीतील व सवाई माधवरावाचे पक्षांतील होते.' __ धन्याचे लक्ष याप्रमाणे कारभारांत नसल्यामुळे जुने व नेकीचे नाना, परशरामभाऊ पटवर्धन यांसारखे सरदार देखील वैतागले होते. नवीन माणसे हाताशी धरावीत, त्यांना राजकारण शिकवावें, त्यांच्या करामतीचा उपयोग करून घ्यावा ही बुद्धी कोणांतही नव्हती. त्यामुळे नवीन महत्त्वाकांक्षी माणसांचा ओढा बाहेर होता. बाळाजीपंत नातूंचेच उदाहरण घ्या. ते इंग्रजांना भाळले, त्याबद्दल सामान्य माणूस त्यांना दोष देतो, व तें साहजीक आहे. पण आमच्या आजच्या देशाभिमानाच्या कल्पना व त्या वेळच्या कल्पना यांत पुष्कळच फरक आहे; आणि शिवाय फडके, पेठे, भानू हीं गरीब घराणी आपल्या कर्तृत्त्वानें पूर्वपेशवाईत पुढे आली, तसे नातूंचे घराणे उत्तर पेशवाईत पेशव्यांच्या कृपेनें पुढे येण्याला वाव असता तर बाळाजीपंतासारख्या धोरणी माणसांनी