पान:लोकहितवादी.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. स्वार्थ आणि परार्थ ही दोन्ही एकत्र साधत असतांना शुद्ध बेइमानगिरीच केली असती, असें तरी कोणास म्हणता येईल ! सांगण्याचे तात्पर्य काय की, धन्याच्या बेहिंमतीमुळे नोकर व सरदार बेदील झाले होते. आजूबाजूला इंग्रजांचा अंमल बसून नाकेबंदी झाली व मुलूखगिरी करण्याचा पिढीजाद मराठी धंदा बुडाला. त्यामुळे बेकार झालेले शिपाई खेडोखेडी माशा मारीत पडले होते. यापैकी थोडीशी माणसें या आळसाला कंटाळून पुष्कळ वेळां वाट मारण्याचाही धंदा करीत. किंवा आपापसांत, गांवागांवांत मारामाऱ्या करून आपली भांडणांची हौस पूर्ण करून घेत असत. पूर्वी ज्यांनी शत्रूशी लढण्याकरितां उत्तरेंत अटकेपर्यंत आणि दक्षिणेत श्रीरंगपट्टणापर्यंत स्वाऱ्या करून कडव्या शत्रूना धूळ चारली त्यांचे वंशज या बदललेल्या दिवसांत बापजाद्यांनी मिळवलेल्या संपत्तीवर गांवोगांवीं लावण्यातमाशांचे फड काढून रंग करीत, किंवा क्वचित् प्रसंगी बाहेरख्यालीपणा करून घरच्या घरधनिणीशी भांडत दिवस काढीत. अशा त-हेनें विस्कळित झालेल्या समाजस्थितीचे चित्र परशराम, होनाजी इत्यादि तत्कालीन शाहिरांच्या लावण्यापोवाड्यांतून रंगलेले आहे. सामान्य रयतेची दुर्दशा ही इतकी उघड उघड दिसते. तिचे जास्त वर्णन करून जागा अडवीत नाही. या बेबंदशाहीच्या कारभारांत हात घालण्याची संधी अल्पिष्टनसारख्या धोरणी मुत्सद्यास केव्हाही मिळालीच असती. पण गंगाधरशास्त्री पटवर्धनांचा* पंढरपुरास पेशव्यांनी करविलेला खून, व त्यानंतर डेंगळ्यांची फितुरी, याने आयतेच कारण मिळाले व गोष्टी

  • .या गोष्टीविषयीं हल्ली दुमत आहे असे दिसते. पण पेशवे पंढरपुरी हजर असतांना त्यांच्या देखत देखत ज्या परिस्थितींत हा खून झाला ती परिस्थिती लक्षात घेतली म्हणजे हा खून पेशव्यांनी करविला नाही असे म्हणावयाला जास्त. पुरावा पाहिजे.