पान:लोकहितवादी.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. येत असत. त्यांनी सकाळी न्हावयाचा समारंभ करावा, तो प्रहर दिवसपर्यंत चाले! नंतर जेवावयाची तयारी झाल्यावर इच्छेस येईल त्या वाड्यांत बाजीरावांची स्वारी जात असे. पंक्तिभोजनाचे समयीं सर्वकाळ बायका जवळ बसलेल्या असावयाच्या. आश्रीत लोकांनी चार चार पांच पांच लग्ने करून घरीं एक बायको ठेवावी, आणि सरकार वाड्यांत बाकीच्या बायका पाठवाव्या ! आणि याजकरितां अन्याबा राहतेकर वगैरे यांनी जास्ती लग्ने केली होती ? जो गृहस्थ वाड्यांत बायको पाठविणार नाही त्याजवर श्रीमंतांची इतराजी व्हावयाची; याजमुळे अब्रूदार गृहस्थांनी वाड्यांत जाण्याचे सोडिलें, इतकेच नाही, तर पुणे देखील सोडिले. सर्व अबदार तितके या कृत्यास नाराजी होते; आणि गैरअब्रुदार तितके या कृत्यांत सामील होत. बायकांनी सर्व कारभार करावा; व उलटा नवऱ्यांवरच त्यांचा हुकूम असे! त्यांनी आपल्या नवऱ्यांकरितां श्रीमंतांस सांगून त्यांस मामलती,कमाविशी, वगैरे द्याव्या !! त्यांजवर नवऱ्यांचा हुकूम इतकाच की, वाड्यांत राहा आणि सरकारची मर्जी खूष करा ! बयाताई दातारीण, शिता शेंडी, काशी दिक्षितीण, उमा फडकीण, ताई पेठीण या प्रकारच्या सुमारे दोनचारशें उनाड बायकांचा थवा नेहमी वाडयांत भरलेला असे. तितवयांचे शंगार, दागिने आणि सोंगट्या वगैरे गोंधळ चालून त्यांत श्रीमंतांनी काळ काढावा ! शिष्ये, पाणके वगैरेंशी व्यभिचाराची त्यांस सदर परवानगी असे ! त्यांत कितीएक स्त्रिया बहूत देखण्या, रूपवान, ज्वान, थट्टेखोर व बोलक्या असत. त्याप्रमाणे रावबाजीच्या कारकीर्दीत सर्व गृहस्थांची घरे खराब झाली ! जेवून उठले म्हणजे पर्वतीस वगैरे दर्शनास आल्यावर शास्त्री, पंडीत व भट यांची कचेरी होत असे. त्यांपैकी कोणी म्हणावें 'बाजी हा कृष्णावतार आहे !' कोणी म्हणावें,