पान:लोकहितवादी.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८५ औद्योगीक शिक्षण. हाण्यास उशीर नाहीं; अशा त-हेची समजूत लोकहितवादींची होती. ही समजत चक्रीची आहे. वाफ व वीज या दोन प्रचंड शक्तींचा शोध लागून त्यांचा उपयोग उद्योगधंद्यांकडे होण्याची एकदां सुरवात झाल्यानंतर या नवीन परिस्थितींत मानसीक श्रमाचे, पांढरपेशा वर्गाचे धंदे व उदीम, व्यापार, कारखाने,या दोहोंतही बुद्धिमत्ता सारखीच लागते. एखाद्या मोठ्या कारखान्याची हल्लीच्या दिवसांत उभारणी करावयाची तर भांडवल मिळविण्यापासून तो कच्चा माल, मजूर, व्यवस्था, विकणे, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत व्यवस्था करावयाची म्हणजे कारखान्याचा मालक किंवा व्यवस्थापक जो कोणी असेल त्याच्या आंगीं बुद्धिमत्ता, ज्ञान, अनुभव, धोरण हे गूण फार वरच्या प्रतीचे असले तरच चढाओढीत त्या कारखान्याचा टिकाव लागतो, अशी आज वस्तुस्थिती आहे. यामुळेच युरोपांतील सुधारलेल्या देशांत, विश्वविद्यालयांचे जुनें स्वरूप बदलून त्यांना नवीन स्वरूप प्राप्त झालेले आहे, व नवीन प्रकारची विद्यालये ( औद्योगीक ) स्थापन झाली आहेतआणि होत आहेत. विद्यालये व कारखाने यांचे संबंध जास्त निकट झालेले आहेत. शारीरीक श्रमांच्या व्यवसायांत लक्ष घालणे म्हणजे सशिक्षीत माणसाला कमीपणाचे तर वाटत नाहींच, उलट विश्वविद्यालयांतील मोठमोठ्या विद्वानांना देखील अशा कामाकडे आपले बुद्धीसर्वस्व खर्च करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे असे वाटते. या दृष्टीने पहातां पांढरपेशा मंडळींनी आपले व्यवसाय सोडन ४. घिसाडकामाकडे " मोर्चा फिरविला म्हणजे देशांतील दारिद्य एकदम नाहीसे होईल ही कल्पना व्यर्थ आहे. असे वाटते. पण या गोष्टी आज जवळजवळ एका शतकाच्या अनुभवाने आम्हांला कळतात. त्या लोकहितवादींना त्या काळांत कळल्या नाहीत म्हणून आम्ही त्यांना दोष देत नाही. आज देखील तशाच प्रकारची