पान:लोकहितवादी.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ लोकहितवादी. नेसावयास लागली तर काय चिंता आहे ! परंतु आपले देशाचे रक्षण करावे. असे झाले म्हणजे बहुत रोजगार रहातील, परंतू हे या लोकांस सुचत नाही. यांस असे वाटते की, आजपर्यंत आपण केलें नाहीं तें पुढे करणार नाही व भलताच रोजगार करणार नाही. दहांबरोबर मरण लग्नासमान आहे, असे ते मानतात; आणि उपाशी मरतात. भट पन्नास हजार खेपा घालतात तेव्हां एक श्राद्धाचें आमंत्रण येते. तसेच शंभर धक्के कोंडीत खातात तेव्हां दोन पैसे दक्षिणा मिळवतात, चोरालबाडाची स्तुती करतात तेव्हां चार पैसे काढतात. दारू पिणारानें शुद्ध व्हावयास पैसा दिला म्हणजे त्यास शुद्ध करतात. सांप्रत ब्राह्मण पैसा दिला म्हणजे कोणतेही दुष्कर्म करावयास सोडीत नाहीत. तसेंच उमेदवार, कारकून शंभर खेपा घालतील तेव्हां दप्तरदाराची भेट, पांचशे खेपा घालतील तेव्हां तो या म्हणतो. मग पंचवीस वर्षे गांवांत भीक मागून त्याचे घरीं काम करावे. चाकरी काचित् कोठे येणार व मग ती प्रथम आपल्या सोयन्याधायऱ्यांस देणार म्हणजे सर्व उमेदवारांनी हात आपटीत बसावे. असे त्यांचे हाल होतात व माणसें अशी जिकीरीस येतात ती पाहवत नाहीत. यास्तव यांनी स्वस्थपणाने दुसरे रोजगार करावे. म्हणजे इंग्रज लोकांच्या शिरस्तेदारांच्या शिव्या, भटांचा अपमान हे कांहीं सोसावयास नको.” प्रभाकर, १३ मे १८४९ य लोकहितवादी. देशी उद्योगधंद्यांविषयींची ही विचारसरणी सामान्यतः बरोबर असली तरी त्यांत एक मोठा दोष आहे. कारकुनी पेशाचे किंवा मानसीक श्रमाचे धंदे सोडून कारागिरीचे धंदे करण्याला या देशांतील लोकांनी सुरवात केली म्हणजे देशाची उर्जितावस्था एकदम