पान:लोकहितवादी.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दारियनाशाचा उपाय. . ८३ याजकरिता या लोकांनी विद्या व ज्ञान यांचे प्राप्तीस झटावें. व इंग्रजांप्रमाणे शहाणे व्हावे आणि जे व्यापार ते करतात ते आपण करावेत. कोणी म्हणतील की, त्यांस द्रव्य अनुकूल आहे आणि या लोकांजवळ द्रव्याची अनुकूलता नाही. तर ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याचा निर्णय आज लिहिणे जरूर नाही. जेव्हां सर्व लोक पुढे सरावे अशी इच्छा करतील व रानटीपणाच्या समजुती सोडून देतील तेव्हां अनुकूलता सहज होईल."........याचसंबंधाने या देशांतील लोकांचे दारिद्य नाहीसे कसे होईल असा विचार करीत असतांना काही मार्मीक विचार त्यांनी प्रसिद्ध केले आहेत ते या ठिकाणी देतो. हे विचार १८५० तील म्हणजे सार्वजनीक काकांची पुण्यातील स्वदेशी सुरू होण्यापूर्वी काढलेले आहेत. नं. ६० च्या पत्रांत लोकहितवादी म्हणतात:-" दुसरा तूर्त दारिश्च मोडण्यास उपाय असा आहे कीं; ब्राह्मण लोकांनी आपल्या मूर्खपणाच्या समजुती सोडाव्या आणि केवळ कारकून आणि भट हे दोनच रोजगार आम्ही करूं असें म्हणू नये. या देशांत आणखी पुष्कळ रोजगार आहेत व तेही आतां दिवसेंदिवस इंग्रज घेत चालले. सावकारी, शेतकी वगैरे इंग्रज करूं लागले, हेच रोजगार आपले लोकांनी करावेत. कोणते म्हणाल तर कांच, कापड, सुरी, कात्री, लांकडी सामान, घड्याळे, चाबूक, यंत्रे इत्यादि पुष्कळ पदार्थ इंग्रज इकडे खपवितात. ही सर्व आपले लोकांनी करावयास शिकावें व येथें जो माल खपणार नाहीं तो दुसऱ्या देशास घेऊन जावा आणि तेथे विकावा. पुष्कळ देश आहेत या गोष्टीचा शोध करावा व इंग्रजांचे देशाचे सामान बंद करावें. किंबहुना आपले सामान त्यांस द्यावे. परंतु त्यांचे आपण घेऊ नये. जो इकडे उत्पन्न होईल तितका माल घ्यावा. विलायती कापड घऊ नये. यारतव आपल्यास जाडीभरडी कापडे