पान:लोकहितवादी.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ लोकहितवादी. कालापव्ययाच्या चाली मात्र रूढ आहेत त्या आहेतंच. त्यांमुळे दारिद्य वाढत आहे. अशी प्रस्तावना करून लोकहितवादी पुढे म्हणतात:-" सर्व आळशी लोकांस पुरेल अशी समृद्धी या देशांत नाही. जसे एका घरांत दहा मनुष्यांचे अन्न असते, तेथें पंचवीस पाहुणे आले म्हणजे घरच्या माणसांनी उपाशी रहावें तरच पाहुण्यांचा काही निर्वाह होईल; तशीच या देशाची हल्ली स्थिती आहे. पहिल्याने मुसलमान लोक व मग इंग्रज या देशांत आले-बाहेरचे जे येतात ते काहीं मेहनत करावयास येत नाहीत. ते आयते खावयास येतात. इंग्रज आले त्यांनी सुखाच्या जागा, मोठी कामें काजें उपटली. हजारों इंग्रज लोक व हजारों शिपाई इकडे येऊन अमीराप्रमाणे राहतात. इतक्या या लोकांचे पोषण हिंदू लोकांचे मेहनतीने में उत्पन्न व्हावयाचे त्यांतूनच होते. वास्तवीक म्हटले तर पाहुणे आले त्यांनी उपाशी रहावे. पण हे साधारण पाहुणे नव्हत तर ते शूर, विद्वान्, गुणी व जबरदस्त आहेत. तेव्हां आपले लोकांपुढे ठेवलेल्या पत्रावळी त्यांनी ओढल्या आणि हे लोक त्यांचे तोंडाकडे पहात बसले.........त्यामुळे हे लोक भिकारी झाले आहेत. अमीरपणा, शिपाईगिरी, राज्यकारभार या लोकांकडे होता, तेव्हां कोणतेही प्रकारे दुर्भिक्ष नव्हते.........परंतू या देशातील कामें व व्यापार इंग्रज लोकांनी घेतले. जडज तेच, मॅजिस्ट्रेट तेच, वस्त्रे विकणारे तेच माल आणणारे तेच, टांकसाळ घालणारे तेच, व शिपाई तेच. इतक्या लोकांची कामें पूर्वी आमचे मध्ये होती तें टीक होते. परंतु ती सर्व त्यांचे हाती गेली. तेव्हा ज्या ज्या लोकांची कार्ये त्यांनी घेतली ते ते लोक रिकामे झाले. आणि उपाशी मरूं लागले.....असा प्रसंग आला. तेव्हां आपले लोकांस सुखी होण्याची युक्ती कोणती म्हणाल तर अशी आहे.