पान:लोकहितवादी.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रजांचा सहवास. निमित्ताने त्यांचे बाहेर देशांशी दळणवळण वाढून निरनिराळ्या चालीरीती, राज्य करण्याच्या पद्धती वगैरेंचें ज्ञान त्यांना होईल व कलाकौशल्य, ज्ञान व संपत्ती यांची संपादणी आमच्या लोकांनी केल्यावर आज राज्यकर्ते जे आम्हांला तुच्छ मानतात तसे ते पुढे लेखणार नाहीत व त्या प्रकाराने लोकांची उन्नतीही होईल असे त्यांचे मत होते. पण हे सर्व घडून येणे इंग्रजी राज्य व इंग्रज लोकांचा सहवास यांमुळेच शक्य झालेले आहे. पूर्वीच्या काळी या गोष्टी कोणी मनांत आणिल्या नसत्या किंवा कोणास बोलून दाखवितां आल्या नसत्या, करणे तर लांबच राहिले. म्हणून इंग्रजांचा सहवास ईश्वरी कृपेमुळे या देशाला प्राप्त झाला आहे असे आपण समजले पाहिजे असें ते म्हणत. पेशवाईच्या अखेरच्या काळात त्या बेबंदशाहीतून, पेंढाऱ्यांच्या व ठगांच्या उपद्रवांतून, बाहेर पडून नुकत्याच समाधान व शांतता अनुभव लागल्या पिढीतील एका पुरुषाचे हे विचार अ हेत एवढी गोष्ट लक्षांत ठेविली म्हणजे आज कसल्याही स्वराज्याची स्तुती करणाऱ्या आमच्या. पिढीलाही त्यांत हंसण्याजोगें कांही दिसणार नाही असे वाटते. लोकहितवादी यांच्या ग्रंथांतून जरूर तेवढे एकदोन उतारे वरील मतांच्या समर्थनाला उपयोगी पडतील असे येथे देतो. उद्योगप्रशंसा, कमती कशाची, निरुद्योगीपणाच्या चाली. ब्राह्मणांच्या चालीरीती वगैरे विषयांवर लिहिलेल्या पत्रांतून तीच तीच मतें पुन्हां पुन्हां सांगितली आहेत. त्यापैकी ४४ नंबरचे पत्र विशेष महत्त्वाचे आहे म्हणून उतारा यांतूनच घेतला आहे. पत्राचा विषय 'हिंदु लोकांनी उद्योग करण्याची अवश्यकता असा आहे. पूर्वी या देशांत लोक थोडे व समृद्धी जास्त अशी स्थिती असल्यामुळे प्रजा सुखी होती. आज लोक पुष्कळ, पण पूर्वीच्या सुखासमाधानाच्या काळांत उत्पन्न झालेल्या, निरुपयोगीपणाच्या, कालक्रमणाच्या किंवा लो.....६ हि एकाही स्वरासणार न