पान:लोकहितवादी.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. जो ही उद्योगीपणाशी अगदी विसंगत आहे, व आमच्या अशा वृत्तीमुळेच उद्योगधंद्याकडे, व्यापाराकडे किंवा धाडस आणि जूट ही ज्यांत लागतात अशा प्रकारच्या उद्योगांकडे आमचे लक्ष लागत नाहीं. यामुळे आमचा देश भौतीक संपत्तीने दरिद्री आहे व त्यामुळेच पराधीनही आहे. अशाच प्रकारची मीमांसा लोकहितवादीनींही केली आहे. आ एका पत्रांत हिंदुस्थानच्या पराधीनतेची कारणे सांगतांना उद्योगधंद्यांचा अभाव हे कारण सांगून ते पुढे असे म्हणतात:-चाकू, कात्री, सुरी इत्यादि लहान सहान पदार्थ देखील आपल्याला चांगले तयार करितां येत नाहीत. कारण यंत्रज्ञान नाहीं व देशांतील बुद्धिवान लोकांचा कल ते करून घेण्याकडे नाही व यामुळे एकीकडे पुष्कळसे लोक केवळ शब्दपांडित्याच्याच विद्या शिकून याचकवृत्तीने कसेतरी पोट भरतात, तर दुसरीकडे परदेशचे लोक येथे येऊन सहजासहजी लाखो रुपये व्यापारांत मिळवून परत जातात. अशी स्थिती दिसते. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शूद्र हे पूर्वीचे चार वर्ण गुणकर्माने झालेले होते. त्या वेळी ब्राह्मण विद्याव्यासंग करीत; वैश्य व्यापार करीत वगैरे व्यवस्था असे. आता हल्ली ही वर्णव्यवस्था मोडली आहे. ब्राह्मण पोटभरू झाले आहेत, क्षत्रिय लोपले व वैश्य परदेशाशी व्यापार वगैरे करीत नाहीत तर उलट सर्वांनाच नौकरी करून पोटाला मिळवण्यांत प्रतिष्ठा वाटते. तेव्हां सर्व शूद्रत्त्वाला पोंचले काय ? अशा प्रकारची खोचदार विचारमालिका एका निबंधांत व्यक्त केलेली आहे. त्याप्रमाणे एकादी जागा सरकारी नोकरीत रिकामी झाली तर त्या ठिकाणी हजारों अर्ज येतात. वर्षानुवर्ष वरिष्ठ अंमलदाराच्या घरी खेटे घालण्यांत उमेदवारांना लाज वाटत नाही. यापेक्षा काहीतरी व्यापार उद्योगधंदे करून पोट भरणे स्वाभिमानाला जास्त पोषक होईल असे त्यांचे म्हणणे आहे. देशातील शिकलेले लोक व्यापार उद्योगधंदे करूं लागले. म्हणजे त्या