पान:लोकहितवादी.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवीन ग्रंथांबद्दलचे औदासिन्य. पंतोजी व शाळा पाहिजेत. जी भाषा व जे ग्रंथ प्रथम मुलांचे हातीं पडतात व ज्या मनुष्याची संगत त्यांस असते तशी त्यांची समजूत होते. यास्तव मुलांस ग्रंथ वाचावयास द्यावयाचे ते प्रथम चांगले पाहिजेत. त्यांस सुबुद्धी होऊन त्याची समजूत चांगली पटावी व त्यांनी बहुत वाचण्यावर लक्ष द्यावे व त्यांच्या मनांत जुन्या........ज्या समजुती येतात त्या सर्व लबाड असे त्यास भासले पाहिजे. व त्यांस ग्रंथांची गोडी लागून ग्रंथ वाचावे असें त्यांस वाटले पाहिजे. ग्रंथ करणारास आजकाल या देशांत खप नाही. ग्रंथ करून त्यांस विकत घेणार मिळविणे म्हणजे मोठा प्रयत्न पडतो. जुलमाने व बळाने ते लोकांचे गळी बांधावे लागतात. त्यांजबद्दल किंमत देणे म्हणजे लोकांस असे वाटते की हा पैसा व्यर्थ आहे. यांत पुण्य नाही व धर्म नाहीं. याप्रमाणे हे लोक दुर्भाग्य आहेत. यांचा काळ विपरीत म्हणून अशी बुद्धी झाली हे तर उघड आहे. परंतु लोक असे समजतील तर बरें. या देशांत ग्रंथ छापणारास पैसा द्यावा हे उत्तम आहे, हाच धर्म आहे. हे मूल्स शहाणे करण्याचे काम हाच श्रेष्ठ धर्म आहे. असे झाल्यावांचून लोक सुधारणार नाहीत.---पत्र नं. ९३. सामान्य लोक ज्याला धर्म धर्म असे समजतात त्या प्रकारच्या कर्मठपणाचा एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून जो लोकहितवादींनी सांगितला आहे तो म्हणजे या देशांतील लोकांची सांसारीक गोष्टीविषयी फाजील विरक्ती व त्यामुळे भौतीक सुखसोयी व भौतीक संपत्ती देशांत ज्या योगाने वाढेल अशा त-हेच्या उद्योगधंद्याविषयी लोकांची अनास्था. जग मिथ्या आहे तेव्हां ऐहीक सुखें म्हणजे दुःखाचें मूळ, त्यांचा त्याग केला पाहिजे अशी मनाची एकदा समजूत झाली म्हणजे उद्योग करून संपत्ती मिळवावी व तिचा व्यय करावा याविषयी मनुष्य साहजीकच बेफिकीर होतो. वैराग्यवृत्ती