पान:लोकहितवादी.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. म्हणतातः–मला निश्चय करून वाटतं की, ज्याला शहाणपणा व ज्ञान मिळवावयाचे असेल त्याने इंग्रजी भाषा व त्या भाषेतील ग्रंथांचे तर्जुमे तरी वाचीत जावे म्हणजे त्यास पुष्कळ गोष्टी कळतील. आतां इंग्रजी विद्या फार सुधारली आहे. त्यांजमुळे त्यांतील भूगोलावर एक ग्रंथ पढलेला व संस्कृत किंवा इतर भाषेत सर्व जमा केले तर एकाची बरोबरी व्हावयाची नाही असे आहे. कारण इंग्रज लोकांनी विद्या फार सुधारल्या; यांजमुळे त्या शुद्ध आहेत. आणि पूर्वीच्या काळी शोध कमी होते. यामुळे विद्या अर्धवट झाल्या व त्या तितक्याच राहिल्या आहेत. केवळ संस्कृतीनेच मनुष्य ज्ञानी किंवा शहाणा होईल असे नाही. व हे एक संस्कृताचे धोरण आहे की, संस्कृत पढलेले भ्रमिष्ट, मताभिमानी, अर्थाचा अनर्थ करणारे असे असतातआतां संस्कृतांत स्वधर्म आहे. याजकरितां याचे ज्ञान असणे जरूर आहे; परंतु तितक्या पुरतें संस्कृत शिकावे; त्यांतील शास्त्र फार पाहिल्याने बुद्धीचा विपर्यास होतो. जुन्या व नव्या विद्यांची याप्रमाणे तुलना करून नवीन विद्या श्रेष्ठ, जास्त उपयोगी असें ठरविल्यावर ती आमच्या लोकांनी मिळवावी कशी याबद्दल लोकहितवादी यांनी काही उपाय सुचविले आहेत. त्यातला एक असा की, देशी भाषांतून नवीन ग्रंथ तयार करवून घेऊन ते शाळांतून शिकवावे व मोठ्या लोकांनी वाचावे. त्यांच्या पिढीचे मोठे लोक संसारांत पडून पोट भरण्याच्या मार्गाला आधींच लागलेले होते. ते यापुढे नवीन काही तरी शिकतील अशी फारशी आशा नव्हती. तरूण पिढीच्या हातूनच काही झाले तर होईल यावर आमची आशा आहे असे ते म्हणत असत. म्हणून पुढे ते म्हणतात:-" यांकरितां विद्याभ्यास जो करविणे तो चांगली समजूत पटेल, लोक विचार करणारे होतील अशा प्रकारचे त्यास