पान:लोकहितवादी.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संस्कृत-इंग्रजीची तुलना. ও व एवढे झाले की, मुलगा शिकला असें बापाला वाटूं लागून तो आपल्याला धन्य मानी. या स्थितीला अनुलक्षून लोकहितवादी म्हणतात. " वेदाचा अर्थ करूं नये, पुराणे, शास्त्रे ब्राह्मणाखेरीज कोणी वाचूं नयेत, परदेशांत गेले तर भ्रष्ट होतो, अशा नाना प्रकारच्या समजुती त्यांच्या पाहून ते शतमूर्ख होतात. अशी थोर, श्रीमंतांची मुलें मला पुण्यांत शेकडों आढळतात व मोठाले वयोवृद्ध कित्येक आहेत त्यांची तर संख्याच नाही. वर्तमानपत्रे व बुकें या द्वाराने ज्ञान मिळवणे हे तर त्यांचे कुळाचे शत्रू. व वाचणे व लिहिणे त्यांचे बापाचे वैरी. असे लोक आहेत. यांस ईश्वर कोणत्या रीतीने ताळ्यावर आणील ते आणो. मला वाटते की, ब्राह्मणाची मुंज झाली की त्यांस विद्या पढवावी. काही चांगले ग्रंथ नवीन पद्धतीचे करून त्यांत नीती व ईश्वरभजनाच्या गोष्टी घालून व इतर भूगोल व खगोल वास्तवीक आहेत, अशा गोष्टी लिहून ते ग्रंथ पढवीत जावें. म्हणजे मूर्खपणा जाऊन तो मुलगा चांगला तयार होईल. असे ग्रंथ कोणीतरी केले पाहिजेत.........शास्त्री पंडीत व यांस होय म्हणणारे गृहस्थ काय बोलतात, हे त्यांचे त्यांस देखील कळत नाही. कोणी म्हणतात की, इंग्रज लोक हे वानर आहेत. तेव्हां माझें मनांत येते की, तुम्ही बोलतां ते डुकर आहांत. यांस फक्त पाठ करणे ठाऊक आहे. कोणी जुन्या ठशाचे लोक शंख करतात की, जुनी वेदविद्या बुडाली; पण महाराज ही विद्या हवी कोणास ? पाठ करावयाची ही विद्या कोणत्याही देशांत नाही. एक अक्षर उलटें सुलटें मागे पुढे पाठ केले म्हणजे कांहीं दूध निघतें काय?" नं. ६९ च्या पत्रांत हाच विषय पुन्हां घेऊन इंग्रजी व संस्कृत विद्यांची तुलना केली आहे. केवळ संस्कृत वाचून उपयोगी ज्ञान मिळणार नाहीं; अशा त-हेची प्रस्तावना करून लोकहितवादी