पान:लोकहितवादी.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ लोकहितवादी. सद्दी चालली होती हैं ठीकच झाले. परंतु आतां बाहेरचे ज्ञान या देशांत शिरले त्याचे पुराने जुनें ज्ञान वाहून गेले. त्याची तुच्छता अगदी स्पष्ट झाली. पाठीमागून पोकळ ढोंग चालत आले, त्याचा पोकळपणा उघडकीस येऊन त्या ढोंगावर पोट भरण्याचे महत्व कमी झाले. तर आतां ज्यांस थोरपणा पाहिजे असेल त्यांनी सांप्रत काळच्या ज्ञानाची संपदा मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्या ज्ञानाने इतर लोकांनी आपली सरशी केली तें ज्ञान आपण धिक्कारूं नये. कारण की, आपणांस त्याचा अनुभव आला आहे. याजकरतां सावधगिरीचे लक्षण हेच की, काळास ओळखून त्याप्रमाणे करावे, असें न केले तर फार फजीत होऊन दुर्दशा झाली आहे, त्यापेक्षा अधीक होण्याचा संभव आहे. पूर्वी जुन्या काळचे ब्राह्मण म्हणजे ऋषी वगैरे यांनी अपुरती कामें ठेवली ती आपण पुरती करावी. त्यांनी वैद्यक पूर्णतेस आणले नाही तर आतां आपण अनेक देशांच्या कल्पना एके ठायीं करून नवे शोध करून ते सुधारावें म्हणजे खरा थोरपणा मिळेल व लोकांचे हीत होईल. असे न होईल तर लोक वैद्यास सोडून नवे डाक्टर, नवी इस्पितळे यांचा आश्रय करतील. आणि पुराणे वैद्य बिचारे उपाशी मरतील. याचप्रमाणे सर्व विद्यांचे आहे." नं. ६२ व नं. ६३ ही दोन पत्रे याच विषयावरील आहेत. ब्राह्मणांची शिक्षणपद्धती, विशेषतः अर्थावांचून पाठ करणे या दृष्टीने या पत्रांतून विचार केला आहे. पदें, क्रम, जटापाठ, घनपाठ, उलटसुलट पदे म्हणणे, पोथीवांचून पदें म्हणणे, व म्हणतां येण्यांत भूषण मानणे इत्यादी प्रकारांचा विचार यांत केला आहे. यांतील विचार खोट्या अभिमानाच्या दृष्टीने पाहणाराला झोंबणारे असले तरी यथार्थ दिसतात. ब्राह्मणाच्या मुलाचे लहानपणचे शिक्षण म्हणजे लिहिणे वाचणे शिकणे व थोडेसें वेदपठण करणे एवढे त्या काळी असे.