पान:लोकहितवादी.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संस्कृत विद्या. ब्राह्मण जातीच्या हातांत टाकल्यामुळे व यज्ञयाग इत्यादी कृत्यांनी ब्राह्मण कोणतीही गोष्ट घडवून आणतील असा धाक इतरांना वाटत असल्यामुळे त्यांचे वर्चस्व हजारों वर्षे राहिले. संस्कृतविद्येचा दुसरा भाग म्हणजे शास्त्रे व नानाप्रकारची मते. वेदांत, बौद्ध, ब्राह्मणमत, पुराणे वगैरे ग्रंथ झाले. वेदांत्यांनी कर्मठपणा खोटा आहे असे ठरवून ब्रह्मविचाराला चालन दिले. बौद्धांनी यज्ञयागांतील क्रूर प्रकारांची टर उडवून दयाभूत धर्म आहे असे प्रतिपादन केले. नंतर ब्राह्मणमताचे पुनरुज्जीवन झाले. त्यांत दया, भक्ती, ब्रह्मज्ञान, कर्मठपणा इत्यादी सर्वच गोष्टींची भेसळ करून सर्वांचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्वांचे नांव जुनी संस्कृत विद्या. आतां या विद्येचा प्रत्यक्ष व्यवहारांत उपयोग पाहूं लागले तर कांहीं नाहीं. कारण हे सर्व ज्ञान जुनें, मिथ्या व काल्पनीक आहे. वैदिकाला यज्ञांत पशू कसे मारावे, मंडपाचे तोंड कोणत्या दिशेस असावें या गोष्टींचा खल करण्यांत सर्वस्व आहे असे वाटते. ज्योतिष्याची दृष्टी शनिमंगळांच्या पीडा व त्यांची दाने यांच्या पलीकडे जात नाही. नैय्यायीक, मीमांसक हे काल्पनीक पदार्थांची चिकित्सा करीत बसून जग मिथ्या आहे का सत्य आहे, या भ्रांतीत पडतात. मंत्र, जादूटोणा, जपतपे यांच्या. मागे लागलेले ब्राह्मण त्यांतच गुंग असतात. याप्रमाणे संस्कृत विद्या निरुपयोगी व नाना प्रकारचे कुर्तक उत्पन्न करणारी, संसारावरील चित्त उडवून आळशी करणारी व निरुपयोगी कर्मे करविणारी आहे. सांप्रतकालीं में ज्ञान पाहिजे ते त्यांत मुळीच नाही. सांप्रत काळचे देश, राज्ये, व्यापार, फौजा इत्यादिकांची माहिती, यंत्रांची उत्पत्ती, कायदेकानू कसे असावे, गैरचाली कोणत्या आहेत, टाकाव्या कोणत्या,. ठेवाव्या कोणत्या, हा विचार त्यांस माहीत नसतो. “जोपर्यंत बाहेरचे देशांतील लोकांचें वर्तमान लोकांस ठाऊक नव्हते" तोपर्यंत जुन्याची