पान:लोकहितवादी.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेल्लींचे शिफारसपत्र. än testimony of my!uniform approbation of his conduct and that of his troops. I request that any British officers and others to whom this paper may at any time be shown will consider Bapoojee Ganesh Gokhaley as the friend of the British Government. URTHUR WELLESLY.. Poona, Gth March 1804. या शिफारसवजा चिटोऱ्याचा अर्थ इतका स्पष्ट आहे की, त्याच्यावर टीका करण्याची जरूर नाही. हे पत्र देणा-या वेलस्ली साहेबांच्या धाडसाची जास्त तारीफ करावी, की बापूंच्या आत्मवंचनेबद्दल रडावे हे ठरविणे कठीण आहे. या अखेरअखेरीच्या दिवसांत पेशवाईची स्थिती अत्यंत हलाखीची होती. खुद्द बाजीरावांचा विचार बघितला तर नशिबाने व नवसअनुष्ठानांनी मिळालेले राज्य चार दिवस भोगावे एवढीच त्यांची इतिकर्तव्यता असावी असे वाटते. वाड्यांत किंवा पर्वतीला कधीं भटाभिक्षुकांचे तांड जमवावेत, त्यांना सव्वा हात लांब केळीच्या पानांवर भोजने घालावीत, अन्नसंतर्पण करावें, दक्षिणा द्यावी; पण याहीपेक्षां, गांवांतल्या उंडग्या बायकांचे थवे जमावावेत व त्यांच्या संगतींत कालक्रमणा करावी, यांतच त्यांचा विशेष वेळ जात असे. लोकहितवादी यांनी ऐतिहासिक गोष्टी या पुस्तकाच्या पहिल्या भागांत शेवटच्या बाजीरावांची दिनचर्या दिली आहे, त्यांतील जरूरी. पुरता उतारा येथे देतो. 'बाजीराव यांची, बुधवार वाडा, शुक्रवार वाडा,फुलशहर म्हणजे फलगांव वगैरे स्थलें प्रसिद्ध आहेत. फुलशहर हा तर पुण्याचा मकरपुराच होता. शिवाय कोथरूडचा वाडा, पाषाणचा वाडा, व पर्वती अशी पांच सहा ठिकाणे होती. वाड्यांत दोनतीनशे बायका नित्य न्हावयास