पान:लोकहितवादी.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ लोकहितवादी. नाही उलट वेदांचा, शास्त्रांचा अर्थ करणे म्हणजे पाप अशी त्यांची समजूत होती. इतकेच नाही तर ती समजूत चुकीची आहे असें कोणी सांगितलेलेही त्यांना खपत नसे. हा सर्व प्रकार पाहून ते संतापत व कित्येक वेळां कडकपणाने , दुसन्याचे मन दुखेल अशा रीतीने लिहीत. हे लेख लिहिले त्यावेळी वेदविद्येच्या अभिमान्यांचा दुरभिमान कोणत्या थराला जाईल त्याचा प्रत्यक्ष अनुभव लोकहितवादींना आला नव्हता. तो पुढे आला. पुण्यांतील दक्षिणा व जुनी पाठशाळा बंद होऊन इंग्रजी कॉलेज झाले त्या वेळी गोपाळराव प्रभृती मंडळींनी दक्षिणेचे पैसे देशी भाषेतून पुस्तके तयार करण्याकडे लावावेत असा अर्ज केला होता. व त्या कामांत ग्रामण्य वगैरे भानगडी उपस्थीत झाल्या व त्यांना बराच त्रास झाला, वगैरे हकीकत मागे त्यांच्या चरित्रांत आली आहे. तो प्रकार पुढे १८६० च्या सुमारास झाला. पत्रे त्यापूर्वी १० वर्षांची म्हणजे १८४९ सालांतील आहेत. त्या वेळीही त्यांची मते ठाम तयार झाली होती असे त्या पत्रांवरून उघड दिसते. एका पत्राचा विषय, 'संस्कृत विद्या' असा आहे. (पत्र नं.८४) यांत संस्कृत म्हणजे संस्कारावरून शुद्ध केलेली भाषा ती संस्कृत असा शब्दाचा अर्थ करून पुढे त्या भाषेत जे ज्ञान आहे त्याचा आजच्या काळी फारसा उपयोग नाही अशा मताचे प्रतिपादन केले आहे. त्या भाषेतील ग्रंथांत ज्ञान फारसें नाही. आहे ते केवळ जुन्या काळचे, त्याचा आतां कांहीं उपयोग नाही. या ज्ञानाचे चार प्रकार आहेत. एक वेद किंवा संहिता, ब्राह्मणे, उपनिषदें वगैरे. यांपैकी सहितेंत अग्नी, मित्रावरुण इत्यादि देवदेवांची स्तुती, छंदांत केलेली असून ब्राह्मणे या भागांत या मंत्रांचा विनियोग सांगितला आहे. म्हणजे यज्ञयाग वगैरे करितांना कोणत्या मंत्रांचा उपयोग करावा, कसा करावा वगैरे गोष्टींचे वर्णन केले आहे. संहिता व ब्राह्मणे ही