पान:लोकहितवादी.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विद्याविषयक पत्रे. ७३ वत् निर्मळ होतील व त्यांचे एक मत व एक धर्म होईल. व जें पाहिजे ते करता येईल. असे केल्यावांचून सांप्रतकाळी हिंदूधर्म भ्रष्ट झाला. त्याचे हातून आम्ही सुटणार नाही. हा धर्म सुधारला पाहिजे.........माझे म्हणण्याचा हेतू इतकाच की, विरोध मोडावे आणि लोकांनी परस्पर ममतेने वागावे. व जसजसें कालेकरून हे अज्ञानपाश सुटतील तसतसे सोडवावे. परंतु या कार्यास आरंभ करावा म्हणजे बरें पडेल. बहूत लोक वाट पाहतात. ब्राह्मण महारांची निंदा करतात व त्यांस शिवत नाहीत व इंग्रजाजवळ प्रीतीने बसतात हे पाहून मला आश्चर्य वाटते. शास्त्राप्रमाणे पाहिले असतां महार हे बरे; परंतु इंग्रजांचे मंडळींत ब्राह्मण असूं नयेत. तत्रापी हे ब्राह्मण मूर्ख त्यांस समजत नाही म्हणून मी हा पाया योजिला आहे. _धर्म सुधारला तर आचार सुधारेल. पण धर्म सुधारावयाचा म्हणजे लोकांच्या खोट्या समजुती गेल्या पाहिजेत. जुन्याचा फाजील अभिमान नाहीसा झाला पाहिजे. म्हणून नवीन विद्या, नवीन शिक्षण हीं पाहिजेत. जुनी संस्कृत विद्या निरुपयोगी आहे. तिला लोकांनी किंवा सरकारने उत्तेजन न देतां पैसा नवीन इंग्रजी विद्येवर खर्च केला पाहिजे व हे पाश्चात्य ज्ञान देशी भाषेत पुस्तकें लिहून आणविलें पाहिजे असे लोकहितवादी यांचे मत होते. या प्रकरणी त्यांची ७८ पत्रे शतपत्रांत आहेत त्यांचा थोडक्यांत सारांश येथे देतो. ब्राह्मणी विद्या, जुनी विद्या किंवा संस्कृत विद्या या नांवांनी जी विद्या त्या काळी आमच्या लोकांत रूढ होती, तिच्यावर लोकहितवादींचा मुख्य आक्षेप म्हणजे, ती केवळ शाब्दीक होती, हा आहे. जे शिकणे तें अर्थ समजून शिकले तर त्याचा उपयोग, नाही तर पोपटासारखें शिकण्यात अर्थ नाही असे त्यांना वाटे व ते रास्तच वाटे. पण सभोवतालचे भटभिक्षूक पाहिले म्हणजे त्यांना अर्थाची कांहीं चाड