पान:लोकहितवादी.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ लोकहितवादी. त्याचे भाषेत करावे. संस्कृत भाषा पाहिजे ते शिकवितील. परंतु ज्यांस येत नाही, त्यांनी संस्कृत भाषेत कोणतें कर्म करण्याची जरूरी नाही. प्रत्येकास आपले विचाराप्रमाणे आचार करण्याची व बोलण्यालिहिण्याची मोकळीक असावी. प्रतिबंध असू नये. पांचवें, स्त्रीपुरुषांचे अधिकार धर्मसंबंधी कामांत व संसारांत एकसारखे असावे. येणेकरून पुनर्विवाह व मोठेपणी लग्न झाले. सहावें, आचारापेक्षा नीती प्रमूख असावी. आचाराचे महत्व हल्ली आहे तसे असू नये. आतां कितीएक बायका लबाड असतात; परंतू पिंपळाच्या प्रदक्षिणा अंतरत नाहीत हे काही उपयोगी नाही. सातवें, अर्थाशिवाय काहीएक म्हणूं नये. आठवें, मनुष्यमात्रास तुच्छ मानूं नये. जातिअभिमान नसावा. सर्वांशी सारखें दयापूर्वक वर्तावें. सर्वांचे कल्याण करावें. नववे, स्वदेशाची प्रीती व त्याचे कल्याण विशेषेकरून मनांत वागवावें. दहावें, ज्यास जो पाहिजे तो त्याने रोजगार करावा. अकरावें, गुणेकरून व योग्यतेवरून जातिभेद मानावा. कुळेकरून मानू नये. बारावें, सरकाराहून प्रजेचे अधिकार अधीक असावे. म्हणजे जे जे रयतेच्या हिताचे कायदे आहेत ते सरकाराशी भांडून घेत जावे. तेरावें, राजाने जे नियम केले असतील ते व जे ३श्वरीबुद्धिसूचीत नेम आहेत, ते मानावे. चवदावें, विद्यावृद्धीकरितां सर्वांनी मेहनत करावी. दुःखितांस सूख, रोग्यास औषध, मूर्खास ज्ञान व दरिद्यास शक्त्यनुसार द्रव्य देण्यास अंतर करूं नये. पंधरावे व शेवटचे कलम असे आहे की, सर्वांनी सत्याने वागावें......... विद्येमध्ये ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत, त्यांचा शोध करण्यास आळस करूं नये. आणि सांपडतील त्या सर्व प्रसिद्ध कराव्यात. विद्या व ज्ञान संपादन करण्यास सर्व सारखे अशी मोकळीक असावी. याप्रमाणे धर्म सुधारणा केली असतां आपसांतील तंटेभांडणे मोडून "लोक गंगाजळ