पान:लोकहितवादी.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मसुधारणाविषयक पत्रे. शास्त्र, नियम वगैरे पाहिजेत; शास्त्र लोकांचे सुखाकरितां केलें आहे. शास्त्राचा मुख्य हेतू हाच आहे की; लोकांमध्ये व्यवस्था व्हावी. ज्याचे त्यास मिळावें. कोणाची जबरी कोणावर होऊ नये. मालको कायम रहावी, प्रजेनें नीट वागावे, राजाने प्रजेचे सुखावर नजर देऊन वसूल घ्यावा, जास्ती घेऊ नये, व खर्च बेताने करावा. कारण लोकांचे मेहनतीचा पैसा घेऊन राजाने आपल्या सुखाकरितां व हिताकरितां व डामडौलाकरितां निरर्थक शिपाई व अंमलदार बाळगणे व यांजकडे खर्च करणे उचीत नाही व अयोग्य मनुष्यास कामावर न ठेवणे हाही राजाचा मुख्य धर्म होय. तर धर्म म्हणजे जे नियम लोकांकरिता केले आहेत ते. व जी आपली योग्यता त्या योग्यतेप्रमाणे व्यापार करणे म्हणजे ब्राह्मण ( अर्थात् योग्यतेने गुणानें, कर्मानें ) असल्यास विद्या व शूद्र असल्यास कृषीकर्म करणे हाच धर्म आहे व याप्रमाणे बरोबर चालून प्रतारणा न करणे व कोणास दुःख न देणे हाच पुरुषार्थ आहे. आणि धर्माचे व शास्त्राचे मूळ विचाराने हेच कळतें." धर्मसुधारणा या विषयावरील लिहिलेल्या एका पत्रांत (नं. ६४) अशाच प्रकारचे विचार आहेत. त्यांत सुधारणा कोणत्या व कशा झाल्या पाहिजेत याचे विवेचन केलेले आहे. म्हणून त्यांतील जरूरीपुरता उताराही येथेच देतो. पूर्वीच्या काळी व्यवहार बदलत तसतशी शास्त्रांतही सुधारणा होत असे; अशी प्रस्तावना करून व आजच्या परिस्थितीतही यांचप्रमाणे व्हावयाला हरकत नाही असे सांगून लोकहितवादी पुढे म्हणतात,धर्म सुधारण्याची कलमें अशी आहेत. प्रथम, सर्वांनी ईश्वराचे भजन अंतःकरणापासून करीत जावे. दुसरे, जसा आपला जीव तसा दुसऱ्याचा जीव मानावा. तिसरें, मुंज, लग्न, प्रेतक्रिया हे तीन संस्कार ठेवून बाकीचे रद्द करावे. चवथे, जे कर्म करावयाचे तें स्वभाषेत अर्थ समजेल असें करावें. भजन पूजन संस्कार सर्व ज्याचे