पान:लोकहितवादी.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ लोकहितवादी. असे कित्येकांस वाटते. कुळंबी माजले व ब्राह्मण त्यांचे बरोबर झाले हे वाईट वाटते. (१८) उद्योग न करावा हे थोरपणाचें चिन्ह. व थोरांनी वेडे व भोळसर असावें व द्रव्याचा उपयोग इतकाच कीं; चार लोकाचें चालवावें; स्वस्थ खावें व स्नानसंध्येत आयुष्य घालवावें. हाच थोरपणा असे समजतात. (१९) संस्कृत भाषेखेरीज बाकीच्या विद्या व भाषा नीचे साधन आहेत. (२०) स्नानसंध्येचा डामडौल तो धर्मशील आणि पुण्यवान् । मग त्याची वर्तणूक कशीही असो. (२१) स्त्रियांना विद्या शिकवू नये, कारण व्यभिचार वाढेल. ( २२ ) थोडा पराक्रम व थोडी ब्राह्मणांवर भक्ती केली म्हणजे ईश्वराचा अवतार म्हणून त्याची लोकांत प्रसिद्धी होते. जसें शिवाजी भवानीचा अवतार, माधवराव पेशवे विष्णूचा अवतार इत्यादी. (२३) मुलगा झाला तर संतोष, मुलीचा संतोष नाही अशी रूढी आहे. (२४) स्त्रियांचा पुनर्विवाह करूं नये. कारण की, जिच्या प्रारब्धीं सूख आहे तिचा नवरा मरणार नाही. जी अभागी तिचा मरतो. (२५) नवसाने देव पावतो. व मनुष्याच्या सुखदुःखांवर नवग्रहांचा अंमल चालतो. म्हणून त्यांचे नांवानें ब्राह्मणांस दानें वगैरे केली म्हणजे पीडा दूर होते. (२६) स्वार्थ पहावा. लोकांची काळजी करूं नये. या अर्थाची म्हण आहे की; लष्करच्या भाकन्या कोण भाजतो ? राजाची लेकरें काय खातात याची चौकशी कशास; या समजुतींत हिंदू लोक सांप्रत