पान:लोकहितवादी.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुन्या समजुती. परदेशांतील व स्वदेशांतील वर्तमानास गैरमाहीत. पलीकडचे घरी काय होते याची काळजी शेजारी करीत नाहीत. (२७) आपल्या पाठीमागे कसे होईल याची काळजी करूं नये. * आपण मेला जग बुडाला' इत्यादी म्हणी आहेत. (२८) पुष्कळ पैसा उधळला म्हणजे लोकांत कीर्ती होते. मग तो पैसा कोठूनही येवो. (२९) यत्किंचित् कारणाकरितां खळवाद करितात. आणि भिकारी होतात पण त्यास सोडीत नाहीत. . (३०) परक्याजवळ हात जोडून राहतात पण स्वकीयाशी लढतात. अशी चाल आपले लोकांची आहे. आपसांत प्राण देऊन भांडतात पण परक्याच्या लाथा सोसून नम्र राहतात. एकूण तीस प्रश्न मी घातले आहेत ते ज्यास अमान्य असतील त्यांनी लिहून कळविल्यास मला संतोष होईल. परंतु या समयीं मूर्खपणाच्या समजुती इतक्या दृढ आहेत की, त्यांस असे वाटते की, काय हे प्रश्न ? त्यांची उत्तरें काय द्यावयाची आहेत ? पण तसे नव्हे. या गोष्टी मोठ्या आहेत व लोकांच्या गैरसमजुती जाव्या व त्यांनी सूज्ञ व्हवे, अशी इच्छा ज्यास असेल त्यांसच हे पत्र आहे. इतर जे लक्ष्मीचे बंधू आहेत त्यांचा हिशोब व गणना आमचे मनांत मुळींच नाही. ते बोलले सारखे न बोलले सारखे ही विनंती. लो. हि. या व अशा प्रकारच्या इतर समजुतींवर अनेक प्रकारांनी टीका करण्यांत पुढील बहुतेक पत्रे त्यांनी खची घातली आहेत. व त्यांत; त्यांच्यामुळे आचार बिघडला हे सूत्र मुख्य धरून त्या समजुतींवर टीका करून शुद्ध आचार कसा असावा हे अनेक ठिकाणी सांगितलेलें आहे. नं. २८ च्या पत्राचा विषय “विधिनिषेधरूपधमांचे मळ" असा आहे. त्यांत धर्म कसा पाहिजे त्याचे विवेचन व्यावहारीक