पान:लोकहितवादी.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७ जुन्या समजुती. (७) सर्व गोष्टी नशिबाने घडतात. शहाणपण व उद्योग यांचा उपयोग नाही. (८) सर्व सूख द्रव्यापासून आहे. त्या पलीकडे सूखही नाहीं व सर्व गुणांचे अधिष्ठान तेंच आहे. (९) विद्या पोट भरावयाकरितां शिकावी व श्रीमंतांनी शिकणे जरूर नाही. (१०) देशाचार, वृद्धाचार, शिष्टाचार इत्यादीक जुन्या चालींविरुद्ध आचरण करूं नये. मागील चाल चालत आली ती चालवावी याविषयी आग्रह धरितात. (११) वाईट गोष्ट असेल आणि ती चार लोकांचे पोट भरण्याचे साधन असेल तर मोडूं नये. (१२) घर सोडून बाहेर जात नाहीत व मुलांस वगैरे घरी बाळगण्याविषयी उत्कंठा धरितात. (१३) मुले नातवंडे झाली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असें वडिलांस वाटते. यास्तव मुलांची लवकर लग्ने करितात. (१४) इंग्रजांचे राज्यांत पैशास बरकत नाही. पाऊस कमी व जरीमरी जास्त म्हणतात. व याचे कारण देवताक्षोभ झाला आहे व इंग्रजांचे कायदे व रीती वाईट आहेत म्हणून समजतात. (१५) ब्राह्मणानें अपराध केला तरी त्यास शासन करूं नये व त्याचे सर्वस्वी चालविण्यांत महापुण्य आहे असे मानतात. . (१६) धष्टपुष्ट ब्राह्मणास केला तरी तो धर्म; पण आंधळ्या कुणब्यास, किंवा लंगड्या ब्राह्मणास दिले तर तो धर्म नव्हे. (१७) पहिल्या लढाया व दंगे होते तेव्हां शिपायांचे पोट भरत होते. आतां जिकडे पहावे तिकडे सामसूम झ.ले आहे. हे वाईट