पान:लोकहितवादी.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- लोकहितवादी. नं. ८ चे पत्र-जुन्या समजुती. आमचे लोकांच्या पुष्कळ मूर्खपणाच्या समजुती आहेत व इतकी ज्ञानाची प्रसृती झाली आहे, तरी लोकांचा वेडेपणा अद्याप दूर झाला नाही. माझे आढळण्यांत ज्या समजुती आल्या आहेत त्यांची आपल्या पत्रद्वारें एक यादी प्रसिद्ध करून असे इच्छितों की; कोणी समजदार मनुष्य असेल त्याने त्यांविषयी प्रतिपादन किंवा निषेध करावा. मला वाटते की, या समजुती अगदी मूर्खपणाच्या आहेत किंवा शहाणपणाच्या आहेत, याचा निश्चय झाला म्हणजे संशय जाईल. (१) ब्राह्मणाशिवाय अन्य वर्णाने विद्या करूं नये. संस्कृत विद्या एकीकडेच राहो. परंतु एकादा मराठा किंवा इतर जातीतील कारकून ब्राह्मणांनी पाहिला म्हणजे त्यांचा तिळपापड होतो हे काय ? (२) ज्ञान व विद्या वाढवू नये. कारण शहाणे व वेडे एकाच दराने विकतील असें भय बाळगतात. (३) जर कोणी अपराध करून ब्राह्मणांची घरे भरली तर त्यास पुण्यवान् असे समजतात. याचे उदाहरण बाजीराव पेशवे. यांचे अपराध कोणी मनांत आणीत नाहीत व ब्राह्मण प्रजा त्यास योग्य मानितात. ( ४ ) देवब्राह्मणांकरिता कशीही कर्मे केली तरी चिंता नाही. यास उदाहरणें, कबीराने साधूस जेवण देण्याकरितां चोरी केली,इत्यादी. (५) ज्या यंत्र में बहुत माणसांचे काम थोडे माणसांचे हातून होतें तें चालू करूं नये. म्हणजे डांक, छापखाना, टांकसाळ, हे कारखाने लोकांचे पोट बुडवणारे म्हणून त्यांचा द्वेष करतात. (६) सरकार करील ते करील. सत्तेपुढे शहाणपण नाही..