पान:लोकहितवादी.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतपत्रांतील काही उतारे. येईल. (१) स्त्रीपुरुषांच्या परस्पर संबंधांत असणारी विषमता. ही विषमता बालविवाह व विधवाविवाहाला प्रतिबंध या दोन कारणांनी उत्पन्न झाली व हिचा शेवट सामाजीक सार्वत्रीक अनाचारांत झाला आहे. (२) जातीजातींतील विषमता. हीमुळे समाजांत एकाच वर्गाला किंवा जातीला फाजील महत्व मिळून इतर जातींचे त्यामुळे नुकसान झालें आहे. त्यांच्या श्रमांचे चीज होण्याला अवकाश नाही, वरिष्ठ जातींना समाजाकडून शासन होण्याची भीती नसल्यामुळे त्यांच्याकडून आपापली कर्तव्ये बरोबर होत नाहीत व एकंदरीत समाजाला हीनपणा आला आहे. (३) पुरुषांनी स्त्रियांना व वरिष्ठ जातींनी खालच्या जातींना ताब्यात ठेवण्याकरितां धर्म व रूढी यांची निकट सांगड घालून ठेवल्यामुळे कर्मठपणा व शब्दछल या गोष्टींना फाजील महत्त्व आले. व त्यामुळे धर्माचें तेज लोपलें. ब्राह्मण वर्गाचा कर्मठपणा ढोंगीपणा राष्ट्रहिताचा आड येऊ लागला. मिक्षुकवृत्ती, ऐदीपणा, चैन, परावलंबीपणा इत्यादी अनेक समाजहितविघातक दुर्गुणांनी वरच्या वर्गाचा -हास होत चाललेला आहे. ( ४ ) त्यांतून काही उपाय असेल तर परकीय उच्च प्रकारच्या संस्कृतीशी आमचा संबंध आला यांतच आहे. या संस्कृतीचा व तीमुळे उपलब्ध झालेल्या साधनांचा उपयोग केल्याशिवाय राष्ट्राला तरणोपाय नाही. जुन्या समजुती नाहीशा केल्या तरच लोकहीत होण्याची काहीतरी आशा आहे. या जुन्या समजुती कोणत्या त्यांची एक तीस कलमी याद शतपत्रांपैकी नंबर ८ च्या पत्रांत लोकहितवादी यांनी दिलेली आहे ती अशी:--- - लो....५