पान:लोकहितवादी.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. दक्षिणेत मराठे व हैदरटिप्पू यांनी काही वर्षे टिकाव धरिला. पण अखेरीस टिपूसाहेबांचा गैरमुत्सद्दीपणा व मराठे सरदारांचे .आपापसांतील कलह या व अशा इतर कारणांनी या दोन राज्यांना उतरती कळा लागली. म्हैसूरचा सर्वच कारभार सन १७९९ साली आटपला. व त्याच सुमारास, सवाईमाधवराव, नाना, महादजी, फडके, परशरामपंत पटवर्धन इत्यादि का पुरुषांचे एकामागून एक घडून आलेले मृत्यू, रावबाजीचे राज्यारोहण, पुण्याची लूट, व वसईचा तह इत्यादि ज्या अनेक घडामोडी मराठेशाहीत लागोपाठ घडून आल्या त्यांमुळे ते राज्यही त्याच वेळी नामशेष झाले असे म्हटले तरी चालेल. एकीकडे मराठे मुत्सद्दी व वीर ' आता राज्याचा निभाव कसा लागतो' या काळजीने दिवसेंदिवस खंगत चालले होते, तर दुसरीकडे इंग्रजी मुत्सद्यांचा आत्मविश्वास, आभिमान, हिंमत ही वाढत होती. या विधानाचे प्रत्यंतर पहावयाचे असल्यास सरदार बाप गोखले यांच्या चरित्रांत एका प्रसंगी त पहावयास सांपडते. वसईच्या तहानंतर पेशव्यांचे सेनापती बापू व इंग्रजी सेनापती आर्थर वेलस्ली यांनी मिळून पुण्याच्या आसपासचा बंडावा मोडला. दोन्ही फौजा आपापल्या घरी परत निघते वेळी बापूंच्या कामगिरीबद्दल एक "शिफारसपत्र” त्यांस वेलस्ली साहेबांनी दिले. त्यांत खालील मजकूर सांपडतोः " Bapoojee Ganesh Gokhaley joined me with the boriy of 1 sahratta Troops under his command in the me under his command in the month of March 1802 . His troops were engaged with the enemy repeatedly conducted themselves wen and Gokhaley particuand always conducted themselves distinguished himself...and then in a late action against midable band of free booters, who had assembled upon tiers of the Peshawa's territories, and cut off the :n of the city of Poona. I have given him this paper larya a formidable band