पान:लोकहितवादी.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. पडली म्हणजे अंगवळणी पडते. नंतर लिलांव सुरू करतात म्हणजे जो अधिक बोलेल त्याचा फैसल्ला होतो. अशा तर गोष्टी हमेश पाहण्यात येतात. व डौल करणारे हे लोक असे आहेत की, आपली योग्यता व थोरपणा काही जाणत नाहीत. यांनी कचेरीतून घरी जातांना रोज शिपाई बरोबर नेत असावे आणि त्यांमध्ये आपण डुलत डुलत डौलाने चालावें, म्हणजे घरच्या बायका किंवा रांडा यांनी आपले यजमानास पाहून धन्य मानावें. अशाकरितां हे प्रयत्नाने शिपाई मिळवतात व पुढे चालवितात. असे काही चमत्कारीक रिवाज या मूर्तीचे आहेत....तात्पर्य सांप्रतचे नेटीव अंमलदार मूर्ख आहेत. यांस इंग्रज आतां चाकऱ्या देतात एवढ्याही देण्याची योग्यता यांजमध्ये नाही. परंतु इंग्रज मेहेरबानी करितात. मी एकदां खेड्यांत एका कुणब्याचे तोंडाने ऐकिले की, साहेबाचे राज्य चांगले, साहेब न्यायइनसाफ चांगला करतो; पण ब्राह्मण लोक त्यास शिकवून आमची घरे बुडवितात. आणि बहूतकरून सर्व रयतची समजूत अशीच आहे आणि ती खरी आहे. हे हलकट लोक फार प्रळय करतात आणि त्यांस आशा फार म्हणून जोपर्यंत नेटीव लोक लोभी व दुर्गुणी आहेत तोपर्यंत त्यांचा पक्षपात कोणी धरावा ? " इंग्रजी अमलाच्या अवलीस मराठी समाजांत जे गुणदोष विशेषतः दोषच-दिसत होते त्यांपैकी एक दोहींचे वर्णन आतापर्यंत होईल तों लोकहितवादींच्या विचारसरणीला अनुसरून व त्यांच्या भाषेतच केलें आहे. अशाच दृष्टीने सर्व शतपत्रांची छाननी करूं लागल्यास पुष्कळच जागा लागेल; तेव्हां तसे न करतां थोडक्यात त्या शतपत्रांचा सारांश काय तें आतां सांगतो. समकालीन समाजात व विशेषतः त्या वेळच्या पुढारलेल्या पांढरपेशा-ब्राह्मण भटभिक्षुकवर्गात लोकहितवादींना जे दोष दिसले त्यांचे वर्गीकरण असें करितां