पान:लोकहितवादी.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतपत्रांतील काहीं उतारे. होतें ? इंग्रजी राज्यांत हे रयतेचे दुर्दैव आहे की, ज्या साहेब लोकांच्या हाती नेमणुका द्यावयाच्या असतात. ते त्या देतेवेळेस काही विचार बघत नाहीत. मनास येईल त्यास देतात. त्यांची विद्या, गुण नीती, अब्रू यांचा शोध घेण्याचे श्रम करीत नाहीत, म्हणून अयोग्य लोक मोठमोठ्या जागांवर मुक्रर होऊन लांचेचे वगैरे मोठे बोभाट उठले आहेत. साहेब लोकांचे हातीं राज्य गेले परंतु ते इकडील लोकांप्रमाणे काम करण्यांत माहीतगार आहेत असे नाही. ते विद्वान, शहाणे, निःपक्षपाती आहेत, पण देशाची व भाषेची माहिती नेटिव लोकांप्रमाणे त्यांस नाही. यामुळे नेटिव लोक जे त्यांचे हाताखाली असतात त्यांच्या हाती रयतेचे बरेवाईट करण्याचे असते. गरीब लोकांस कामगार हेच साहेब असतात. आणि हे वाईट चालीचे-आशाबद्ध व द्रव्यलोभी असतात म्हणून लोकांस फार छळतात. साहेब लोक मोठे काम त्यांस देतात. त्याची हुषारी मान पाहतात; पण कामगाराचे फक्त हुषारीचा काय उपयोग? ती शिवाय दुसरे बहूत गूण त्यांस पाहिजेत.... पुण्यांत सरंजामवाले संभावीत गृहस्थ आहेत. परंतू त्यांतील चांगला मनुष्य आणि विद्वान आजपर्यंत कामावर कोठे नेमिला आहे असें नाही........याप्रमाणे कुलहीन लोक इंग्रजाचे दरबारांत फार जमले आहेत.......येणेकरून लोकांची अब्रू जाते आणि ठेवणाराचे बुद्धीचीही प्रशंसा होत नाही. याचा बंदोबस्त लवकर होईल अशी आशा आहे." त्याप्रमाणे नेटिव कामगारांविषयी दुसऱ्या लेखांत ते म्हणतातजे नेटिव कामगारांशी संबंध ठेवतात त्यांस हे विदीतच आहे. व नेटिव कामगारांमध्ये चांगला गुण कोणता असतो हे तरी मनांत आणा. हे बहूतकरून अविद्वान, ढोंगी व लबाड असतात. खर्च तरी कसा निभेल असा विचार करून पहिल्याने भयाने व लजेनें खऱ्याकडून पैका घ्यावयास आरंभ करितात. व मग एकदां संवय