पान:लोकहितवादी.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ लोकहितवादी. साहेब लोक थोडे व परकीय आणि आमच्या भाषेला, रीतिरिवाजांना पारखे असल्यामुळे या खालच्या अंमलदारांचेच प्राबल्य कारभारांत विशेष होते. सरकारचे कायदेकान सुधारत असूनही त्यांची अंमलबजावणी करणारे अंमलदार वाईट असल्यामुळे रयतेच्या दृष्टीने दररोजच्या कारभारांत फारसा फरक झाला नाही. व नेकीचे खानदानीचे सरकारी अधिकारी असले म्हणजे लोकांच्या चालीरीतींना त्यांच्या उदाहरणामुळे में एक इष्ट वळण लागतें तें तितकें लागले नाही. या परिस्थितीचे मार्मीक विवेचन लोकहितवादी यांनी काही पत्रांत केले आहे. __पत्र नं. १ व नं. ९ अशी दोन पत्रे नेटिव्ह अंमलदार या विषयावर आहेत. पुण्यातील एका ब्राह्मण अंमलदारांविषयी त्या वेळी पत्रांतून बराच गवगवा झाला होता. व त्यांत थोडेसें तथ्यही होते. त्यावरून ब्राह्मण तेवढे लबाड अशी ओरड काही ठिकाणी सुरू झाली. त्या प्रसंगाला अनुलक्षून गोपाळराव म्हणतात:-" ब्राह्मण लोकांनी वाईट वर्तणूक केली असें अनुभवावरून वाटते ते खरे आहे. परंतु त्याचा दोष ब्राह्मणाकडे नाही. कारण चांगले वाईट लोक सर्व जातींत असतात. पण त्यांपैकी पक्का शोध करून चांगले कुलीन संभावीत, नीतिमान असे असतील त्यांस अधिकारावर नेमावें. धर्मशास्त्रमयूरवांत प्रथमतः श्लोक आहे तो असा की; व्यवहारान्नृपः पश्येत विद्वभिाह्मणैः सह धर्मशास्त्रानुसारेण लोभकोधविवर्जितः॥१॥ श्रुताध्ययनसंपन्ना धर्मज्ञाः सत्यवादिनः राज्ञा सभासदः कार्या रिपौ मित्रे च ये समाः॥२॥ याप्रमाणे बहूत अध्ययन केलेले, बहुत ऐकिलेले, धर्म जाणणारे सत्य बोलणारे, निःपक्षपाती सभासद राजाने अधिकारावर नेमावे म्हणून आहे. त्याप्रमाणे जर ब्राह्मण लोक नेमिले असते तर असे कां