पान:लोकहितवादी.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९. शतपत्रांतील काहीं उतारे. षतः जुन्या जहागीरदार, इनामदार घराण्यांतील मंडळींनी पुढाकार घेऊन ते केले असते तर विशेष त्रास न पडतां तें झालेंही असते. या वर्गातील मंडळींचे आपल्या समाजांत स्वाभाविकपणेच वजन होते. बहुजनसमाजाला त्यांच्याबद्दल थोडासा तरी आदर वाटत होता; व त्यांनी नव्या चालीरीतींचा मोकळ्या मनाने व योग्य त्या मानाने पुरस्कार केला असता तर लोक त्या मताला मान देऊन त्याच्या मागे गेले असते. पण हे व्हावे कसे? या कुलीन व संभावीत मंडळींना शिकण्याची, लिहिण्यावाचण्याची हौस फार कमी होती. त्यांच्या. भोवतालची आश्रीत, भिक्षूक, वैदीक, पुराणीक वगैरे मंडळी त्यांना सांगे की, महाराज या म्लेंच्छ विद्येच्या मागे आपण लागू नका. आपल्या पूर्वजांनी चाली घालून ठेविल्या आहेत त्या काय वाईट असतील की काय ? व ते या मंडळींना खरेही वाटे. लोकहितवादी यांच्या शतपत्रांतील आरंभीच्या काही पत्रात या स्थितीचे वर्णन चांगलें. कले आहे. त्यांतून नमुन्यासाठी काही उतारे येथे देतो.. “पुणे येथील नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना" या विषयावरील ता. २६ मार्च १८४८ रोजी प्रभाकर पत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखांत खालील मजकूर आहे: "पुण्यातील बहूत गृहस्थांस सांप्रतकाळी विद्या आणि ज्ञान काय आहे याविषयी समजूत नाही व ते आज बहूत वर्षे घरीं स्वस्थ बसून इंग्रज सरकारची देणगी खात आहेत. यांमुळे अशा कामांत ते झटून पडत नाहीत व त्यांना कितीही समजून सांगितले तरी त्यांच्या जुन्या व पोकळ समजुती आहेत त्याच ते खऱ्या धरतोत; व त्या बदलण्यास बहुत दिवस पाहिजेत. याचकरितां दुसऱ्या सभेत जास्त पैसा जमला नाही........अद्याप गृहस्थांपैकी कोणी ग्रंथ वाचावयास येत नाहीत. शाळेतील विद्वान मंडळी मात्र येतात. सरदार लोक येत नाहीत..