पान:लोकहितवादी.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ लोकहितवादी. तीमुळे चांगला होत असला तरी सामाजीक गूण, सामाजीक कर्तव्याची जबाबदारी या गोष्टींचा विकास मात्र तीमुळे तितका होत नाही. तेव्हां अप्रीय पण पथ्यकर असे इंग्रजी शिक्षणरूपी औषध आपण हिंदू लोकांना दिले पाहिजे, त्यांच्यांतील आनिष्ट चालीरीती काही शिक्षणानें, कांहीं कायद्याने, बंद केल्या पाहिजेत. मग हे करितांना लोकांची जरा अप्रियता संपादावी लागली तरी हरकत नाही. आशिक्षीत, अज्ञानी अशा प्रचंड जनसमूहाने परकीय अमलाला कंटाळून कधींना कधी तरी बंड करावें, व मूठभर गोऱ्या लोकांच्या जोरावर स्थापिलेली सत्ता एका क्षणांत नाहींशी होऊन देशभर बेबंदशाही माजावी; असे होण्यापेक्षां सुशिक्षीत लोकांनी आपला कारभार आपण करायाला शिकावें व मग त्यांच्या चळवळींमुळे आपल्या आजच्या अनियमीत सत्तेला पुढेमागें नियंत्रण बसले तरी ते पुरवले. अशा प्रकारच्या उदार धोरणानेच इंग्रजी मुत्सद्यांचा कारभार चालला होता. मिल, बेंथाम यांच्या तालमेंत तयार झालेली मेकॉले-बेंटिकसारखी इंग्रज मुत्सद्दी मंडळी एका बाजूचा पुरस्कार करीत होती. तर या धोरणाने व्यापाराला धक्का बसेल की काय अशी भीती वाटणारे कंपनीचे डायरेक्टर व जुन्या संस्कृत विद्येला भाळलेले विल्सनसारखे पंडित दुसऱ्या बाजूला होते. या लढ्यांत मेकॉले प्रभृतींच्या मताला यश आले. बदललल्या परिस्थितीचे हे मर्म ओळखून व झालेल्या फरकांतच आपल्या राष्ट्राच्या अभ्युदयाची बीजे गूढरूपाने सांठविलेली आहेत ही खूणगांठ मनाशी बांधून या नवीन दृष्टीने आपल्या समाजांत दाष कोणते आहेत याची पाहाणी करावी व ते काढावे कसे हे ठरवावें; लोकांना त्यांच्या वाईट चालीरीती व समजुती यांचेमुळे काय ताट होतात ते समजून सांगावें; अशा प्रकारचे लोकहितवादाचे काम कोणीतरी अवश्य करावयाला पाहिजेच होते. व त्यांतल्यात्यांत विशे