पान:लोकहितवादी.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. त्याविषयी मला असे वाटते की, आम्ही थोर, चार शिपाई अबदागीर बरोबर घेतल्याशिवाय बाहेर कधीं पडत नाही. तेव्हां लायब्ररीत मुलासारखें शिकण्यास जावयाची त्यांना लज्जा वाटत असेल. पण अज्ञानामुळे आणि अश्रुतपणामुळे त्यांची अशी अवस्था झाली. तथापी तिचा परिहारोपाय ते ग्रहण करीत नाहीत हे आश्चर्य आहे. ज्यांस अन्नवस्त्र मिळते ते म्हणतात की आम्हांस विद्येची काय गरज आहे. च ज्यांस मिळत नाही ते पोटापाठीमागे लागतात. तात्पर्य, अक्कल चाढविण्याचे काम कोणाच्यानेही होत नाही."....ही खोडी नेटिव्ह लोक लवकरच टाकतील तर बरे होईल. पूर्वी यांची हीच खोडी होती; परंतु बाहेर ती गोमीसारखी दिसत नव्हती. कारण पुण्यात पेशव्यांचे राज्य होते. त्यामुळे कितीएक प्रष्ठितेने पैसा मिळवीत होते. म्हणून त्यांचे ज्ञान-अज्ञान आजपर्यंत दिसले नाही. परंतु आतां तो समय नाही. आतां बाहेर काय आहे हे समजून आपली नोट अवस्था कशाने होईल हे पाहण्याची वेळ आहे. म्हणून नेटिव्ह लोक आतां आळस व गर्व न करतील तर फार चांगले होईल." त्याचप्रमाणे दुसऱ्या एका पत्रांत ( नं. ५) ते म्हणतातः हिंदू लोक हे आजकाल गाढ निद्रेत आहेत व ती जाण्यास बहूत ग्रंथ व बहूत ज्ञान पसरले पाहिजे. व असे होण्यास बहूत काळ पाहिजे. व त्यास मुख्य अडचण अशी आहे की, सांप्रत काळचे द्रव्यवान ब्राह्मण लोक यास आडवे येतात. म्हणून हे लोक जाऊन नवी प्रजा येईतोपर्यंत हिंद लोकांची सुधारणा होईलसे वाटत नाही. इतर जातीचे लोक तर सांगितलेले ज्ञान ग्रहण करावयास सिद्ध आहेत. परंतु ब्राह्मण लोक तसे नाहीत. पूर्वीपासून त्यांची समजूत अशी पडलेली. आहे की, आम्ही पृथ्वीवर देव आहात व देवहीं आमचे हाती आहेत व आमचे आशीवार्दाने व शापाने पाहिजे तसे