पान:लोकहितवादी.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. बसले अशी एक गोष्ट दिवाटियांनी सांगितली आहे. बारीकसारीक गोष्टींत त्यांचे लक्ष नसे हीच गोष्ट खरी. कि परंतु मुख्य मुद्याची गोष्ट आली म्हणजे मात्र ते कधीं भान विसरले किंवा गैरसावधपणाने वागले असें होत नसे. एखाद्याकडून आपले काम करून घ्यावयाचे म्हणजे आर्जवाने, युक्तीने ते कसे करून घ्यावे हे त्यांना चांगले कळत असे. धोरण, शांतपणा, गोड भाषण में कांहीं सर्व असेल ते त्यावेळी यावयाचें. गुजराथ कॉलेजच्या स्थापनेविषयीं खटपट गोपाळराव अहमदाबादेस असतांनाच चालली होती. गांवांत व्यापारी मंडळींत वर्गणीची याद फिरत होती, त्यांत एका कृपण म्हणून नावाजलेल्या गृहस्थांनीं पंचवीसांचा आंकडा टाकिला. गोपाळरावांच्या बरोबर आलेली इतर मंडळी या शेटजींचा. आंकडा मोठा पडणार या आशेवर होती, ती अगदी निराश झाली. त्यांनी मात्र निराशेचे चिन्ह थोडे देखील दर्शविले नाही. शेटजींच्या बरोबर बोलता बोलतां, त्यांच्या मुलाबाळांच्या, व्यापार उदीमाच्या गोष्टी काढाव्या, हळूच वर्गणीचे बोलावें, असें करितां करितां तास दोन तासांनी २५ चे ५०, १०० असा शेटजींचा आंकडा शेवटी ५०० पर्यंत गेला तेव्हां गोपाळराव उठले. अशाच प्रकारची दसरी एक गोष्ट रा० दिवाटिया यांनी सांगितली आहे व तीवर टीका करितांना जो अभिप्राय व्यक्त केला तोही मोठा मार्मीक आहे. गोपाळरावजींची ती भव्य मुद्रा, त्यांचे स्मितहास्य, बेफिकीर वृत्तीची निदर्शक अशी त्यांची दृष्टी या गोष्टी पाहून मनाला असे वाटे हा पुरुष मोठा वस्ताद असला पाहिजे. हा सगळे जग इकडचे तिकडे करील, पण जगाला मात्र हार जाणार नाही.. __ अखेर अखेरीच्या दिवसांत, कौटुंबीक आपत्तींमुळे, वाढत्या वयोमानाबरोबरच गोपाळरावजींची विरक्ती जास्त जास्तच होत गेली. या