पान:लोकहितवादी.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही आठवणी. बाजूला जात व बैरागी, गोसावी कोणी उतरले असतील त्यांच्याशी तास तास प्रेमळपणाने बोलत असत. घरी परत येतांना घोड्यापुढे धावणारा पोरगा दमला तर त्याला आपल्या मागे बसवून परत आणीत. न्यायासनावर बसले म्हणजे मात्र हा दयाळूपणा त्यांना माहीत नव्हता. वकील अशीलांच्या गोंधळामुळे न गोंधळतां शांतपणाने जो न्याय तोच देत. हे सर्व गोपाळराव निरनिराळे असून एक व एक असून अनेक अशा प्रकारची लोकोक व्यवहारांत त्यांची समवृत्ती होती." केव्हां केव्हां मात्र कळत म्हणा किंवा नकळत म्हणा गोपाळरावांकडून व्यवहारादृष्टीने पाहाणाराला विक्षिप्तपणाचे वाटेल असें वर्तन होई. याचा एक मासला म्हणून दिवाटियांनी सांगितलेली एक गोष्ट येथे सांगतो. ती अशी:-"एक दिवस माझे वडील भोलानाथ हे रावसाहेबांच्या ओट्यावर बोलत बसले असता त्यांनी प्यावयाचे पाणी मागितले. जवळ नोकरचाकरांपैकी कोणी नव्हते. इतक्यांत समोरून एक बाई चालल्या होत्या त्यांच्याकडे गोपाळरवांची दृष्टी गेली. त्यांनी बसल्या ठिकाणाहूनच, आहो (बिजली ) बाई, जरा इकडे या, अशी मोठ्याने हांक मारिली. बाई आंत आल्या व गोपाळरावांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी घरांतून पिण्याचे पाणी आणून दिले. भोलानाथ हा प्रकार याहून चकीतच झाले. आपल्या गांवचा गोविंदभट पंड्या, त्याची बायको ही बिजली, गोपाळरावांची आणि हिची ओळख कुठली आणि कशी! गोपाळराव साबरमतीवर प्रातःस्नानाला जात असत, तिथे घांटावर बिजली ही इतर बायकांसारखी जात असे इतकेंच. अशाच सारखी, डिस्ट्रिक्ट जज्जसाहेब एक दिवस घरी भेटावयास आले असता, त्यांना बसावयास खुर्ची वगैरे न देतां, ओटीवर पडलेल्या एका मोडक्या तोडक्या पेटाऱ्यावर बसवून आपणही तेथेच बोलत