पान:लोकहितवादी.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही आठवणी. ५३ संबंधाची एक गोष्ट पुणे येथे त्यांच्या मृत्यूनंतर दुखवट्याची सभा झाली, तेथे भाषण करितांना सुंदरलालजी नांवाच्या एका वक्त्यांनी सांगितली होती. ती त्यांच्या स्वभावाची उत्तम निदर्शक अशी वाटते म्हणून येथे सांगून हा चरित्रात्मक भाग आतां आटोपता घेतो. कै० रा० ब० देशमूख हे एक साधू पुरूष होऊन गेले असे माझें मत आहे. कोणत्याही सत्कार्याविषयी त्यांचे प्रेम व उत्साह ही अद्वितीय होती. त्यांची सरळ व साधी वृत्ती खऱ्या साधू पुरुषाशिवाय कोणामध्येही आढळावयाची नाही. त्यांना कधीही राग आलेला कोणीही बघितल्याचे, निदान वीस पंचवीस वर्षांपासून जो त्यांचा माझा परिचय होता त्या मुदतीत, कांहीं कोणी मला सांगितले जाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर व अहंकार या षड्रिपूंचा त्यांनी पूर्णपणे जय केला होता; असे त्यांचे आचरण एकंदरीने आपण ध्यानात आणून बघितले म्हणजे आपल्याला समजून येईल. हर्ष किंवा विषाद ही त्यांजमध्ये भिन्नतेने दृष्टीस पडल्याचे कोणालाही माहीत नाही. सर्वदा समानवृत्ती धारण केलेली, असा हा एवढाच योगमार्गी पुरूष माझे पाहण्यात आला. रा० ब० देशमूख साहेबांचे च्यारिस्टर चिरंजीव वारले, त्याचे दुसरे दिवशी मी त्यांचेकडे आर्यसमाजाचे काही कामासाठी बाहेर जावयाचे होते म्हणून त्यांस बरोबर घेण्यासाठी गेलो. ते बाहेरच बसले होते. मला पाहिल्याबरोबर त्यांनी आपला आंगरखा–पागोटें घरांतून मागविले. व समाजाचे संबंधाने ते मजबरोबर बोलू लागले. तितवयांत घरांतून एक मनुष्य मजकडे येऊन मला एकीकडे नेऊन सांगू लागला की; त्यांचे प्रियपुत्र कृष्णराव वारले व त्यांचे प्रेत दहन करून नुक्तीच मंडळी घरी आली आहे. हे ऐकून मला अतिशय वाईट वाटले. व मी रावसाहेबांस, अशा दुःखाचे प्रसंगी मी आपल्याला बाहेर घेऊन जावयाचे श्रम