पान:लोकहितवादी.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. म्हणजे एका नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. कांठावर बसून पहावयाला मौज वाटते, घटकाभर मन रमतें, आश्चर्यचकीत होते इतकेंच. ते या गोष्टींविषयी बोलू लागले किंवा विचार करीत असले म्हणजे अशा वृत्तीचे सूचक असें मंद हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पुष्कळ वेळां झळकतांना दिसावयाचें." या प्रकारच्या अलिप्तपणाच्या वृत्तीची उदाहरणेही त्यांच्या आचरणांत पुष्कळ आहेत; याविषयीं दिवाटिया पुढे म्हणतात-" प्रार्थना समाजाच्या व्यासपीठावर व्याख्यान देण्याकरितां उभी राहिलेली गोपाळरावांची मूर्ती मला अजून आठवते. त्यांचें तें किंचित् वांकडे घातलेले दक्षिणी पागोटें, त्याच्याखाली, पोक्तपणाच्या रेषा असलेला, विस्तीर्ण भालप्रदेश, उंचट भुवया, विचार व वाणी यांवर प्रभुत्व दर्शविणारी त्यांची भव्य मुद्रा या सर्व गोष्टी मला मूर्तिमंत दिसतात. ते बोलूं लागले म्हणजे विचाराच्या नादांत इतके तल्लीन होत की, आपण ओतवंदाला उद्देशून बोलतो आहोत, याचेही त्यांना भान नाहींसें होई. जणू काय स्वगतच बोलावे असे ते बोलत. दोरीचे लहान लहान तुकडे जोडून एखादी लांब माळ तयार करावी, त्याप्रमाणे जे सुचतील ते विचार, जसे येतील तसे शब्द ही त्यांची पद्धत. त्यांना विषयांची वाण कधी वाटली नाही. संसार काय किंवा परमार्थ काय, सर्वच गोष्टींकडे उदासीनपणाने, सस्मित उपेक्षापूर्वक पहाणाऱ्या एखाद्या तटस्थ तपस्व्याप्रमाणे त्यांचे वागणे असे. "रोजच्या व्यवहारांत या उदासीन वृत्तीचा परिणाम नेहमी दिसावयाचा नाही. उलट, कोणीही त्यांचेकडे भेटावयाला म्हणून येवो, कशाही कामाकरितां येवो, त्याचे म्हणणे, शांतपणाने. ते ऐकून घेत. सकाळी फिरावयाला गेले म्हणजे धर्मशाळा, देवळे, असतील त्या