पान:लोकहितवादी.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मीक मते. ४९ प्रत्येक गोष्टीला राजाश्रय पाहिजे असे आपले जुने कण. पण जुनी राज्ये गेली; जुने सरदार आपल्याच अज्ञानांत व फिकीरीत गुंतलेलं. त्यामुळे बहुजनसमाजाला शारता किंवा नेता कोणीच नाही अशी त्याची स्थिती होती. तेव्हां आतां आपलें होणार काय, आणि कसे, हा विचार त्यांच्या मनाला नेहमी त्रास देई व तरुणपणांतल्या उसळणाऱ्या रक्ताबरोबर त्यांचे विचार जोरानें, कित्येक वेळां उच्छृखलपणाने बाहेर पडत. परंतु याही वयांत खऱ्या धर्माबद्दल पूज्यबुद्धी, सात्वीक अशी भावना त्यांच्या मनांत जागृत होती. मात्र व्यवस्थीत शिक्षणामुळे या धर्मभावनेला जो सौम्यपणा सहज यावयाचा तो लहानपणी आलेला नव्हता. पुढे त्यांना जगाचा अनुभव जसा अधीक येत गेला, जुन्या किंवा नव्या मतांचा संस्कार झालेल्या मंडळीच्या गांठी पडल्या, तसे त्यांच्या विचारांना एक प्रकारचे सौम्य, पण स्वतंत्रपणाचें-लहरीपणाचें-स्वरूप आले. _रा. नरसिंहराव भोलानाथ (दिवाटिया ) या प्रसिद्ध गुजराथी लेखकांनी “गुजरात" मासीक पुस्तकाच्या अंकांतून “ स्मरणमुकुर " या नावाची एक लेखमालिका नुकतीच लिहिली आहे. तींतील एक लेख रा० गोपाळराव देशमुख यांचेविषयी आहे. त्यांत त्यांच्या अहमदाबाद येथील काही गोष्टी दिल्या आहेत, त्यांवरून या विधानाला बळकटी येते. रा० दिवाटिया गोपाळरावांच्या धर्ममतांचे पर्यालोचन करितांना म्हणतात-"गोपाळरावांचा प्रार्थनासमाजाशी जरी संबंध असला तरी इतरांच्याहून ते थोडेसे वेगळे असत. त्यांची श्रद्धा खरोखर कशावर होती हे सांगणे कठीण आहे. त्यांना मूर्तीची पूजा आवडत नसे. उलट त्यांना असे वाटे की, आपल्या भोवतालचे विश्व हे विश्वकर्त्याने एक खेळणे तयार केले आहे. मनुष्यांचे आचारविचार, त्यांची सुखदु:खे, ज्याला आपण संसार असे म्हणतो तो संसार लो....४