पान:लोकहितवादी.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ लोकहितवादी. विशेषतः त्यांच्या अहमदाबाद येथील कामगिरीचा उल्लेख करून तिजविषयी काढलेले उद्गार अतिशय महत्त्वाचे आहेत, ते येथे देऊन हे बरेंच लांबलेले अहमदाबाद प्रकरण पुरे करतो. “रा० ब० देशमुखांस अहमदाबाद व एकंदर गुजराथ ह्या प्रांतांत देवतुल्य समजतात. व अशी तिकडे सर्वांची समजूत होण्यास त्यांची तशी वृत्ती व वर्तन ही कारण झाली आहेत. देशमूख हे अहमदाबादेस १२ वर्षे होते. ते अहमदाबादेस आले तेव्हां तेथे कोणत्याही प्रकारच्या सुधारणामतांचे नावही नव्हते. मग तत्संबंधाच्या संस्थांची गोष्ट कशाला विचारतां ? परंतु देशमूखसाहेब आल्यापासून अहमदाबादेस ह्या काळाला उचित त्या सर्व सुधारणामतांच्या संस्था स्थापन होऊन अहमदाबाद शहरचे युग बदलले असे म्हटले तरी चालेल. तथ सर्व सुधारणामतांचे विचार सुरू होऊन समाजाचे पाऊल पुढे पडत चाललें. अहमदाबादच्या अनेक संस्थांशी सरदार देशमूख ह प्रत्यक्ष संबद्ध होते. त्यांची अहमदाबादेहून नाशिकास बढतीवर बदली होऊन ते तिकडे जाण्यास निघाले, तेव्हां अहमदाबादच्या एकदर आबालवृद्धांस अत्यंत दुःख झाले. सर्व शाळांतील मुलें एकत्र जमून त्यांनी रावबहादुरांवर जयजयकारपूर्वक पुष्पवृष्टी केली. त्यांच्याविषया सवांना प्रमादरभाव असल्यामुळे त्यांचा वियोग सवांस दुःसह झाला. त्यांच्या यादगिरीचा एक स्वतंत्र फंड उभारून त्या व्याजांतून देशी कामगिरीला उत्तेजनादाखल बक्षिसें वगैरे देण्याकडे व्यय करण्यात यता: पुढील ३।४ वर्षांत गोपाळरावजींची नोकरी नाशीक, नगर, ठाणे येथे मुख्यत्वेकरून नाशीक येथेच झाली. यावेळी नाशकात सरकारी नौकरींतले वरच्या प्रतीचे अधिकारी सर्व सुधारणावादा अस एकत्र येण्याचा सुयोग आला होता असे म्हटले पाहिजे. रा० ब० आण्णासाहेब भिडे, महादेव गोविंद रानडे, गोपाळराव