पान:लोकहितवादी.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालहत्याप्रतिबंधकगृहाची स्थापना. ४३ देशमूख ही सर्व विद्याभिलाषी व्यासंगी व सुधारकाग्रणी मंडळी एकत्र जमली होती. अर्थातच नाशकास त्यावेळी यांच्या प्रोत्साहनाने लोकोपयोगी अनेक संस्था निघाल्या. त्यांतल्या त्यांत दोन विशेष सांगण्यासारख्या म्हणजे एक वक्तृत्वोत्तेजक सभा व दुसरी अनाथ मुलांचे संरक्षण करण्याकरितां एक संस्था या होत. नाशीकसारख्या क्षेत्रांत, चुकून वांकडे पाऊल पडल्यामुळे, गुप्तरीतीने प्रसूतीकरितां येणाऱ्या उच्च पांढरपेशा वर्गातील, व विशेषतः ब्राह्मणजातींतील विधवांची संख्या मोठी असते-निदान त्यावेळी ती असे; यांत शंका नाही. व अशांनी प्रसूतीनंतर मुकाट्याने वाळवंटांत नदीतीरी टाकून दिलेली लहान अर्भकें नेहमीच सांपडत. वाडी, पंढरपूर इत्यादी क्षेत्रांच्या इतर ठिकाणीही असाच प्रकार होता, व थोड्याशा कमी प्रमाणांत असेल, पण आजही आहे. ही शोचनीय स्थिती दूर करण्या_ करितां एक बालहत्याप्रतिबंधकगृह काढून त्या ठिकाणी अशा नडलेल्या बायकांच्या प्रसूतीची सोय करावी या हेतूने या मंडळींनी नाशीक येथे खटपट करून एक संस्था स्थापन केली. वक्तृत्वोत्तेजक सभेची हकीगत ही अशीच आहे. रानडे, देशमूख ही मंडळी सभेला नेहमी हजर असावयाची, बोलावयाची; इतर मंडळींना, विशेषतः तरुण होतकरू मंडळींना बोलण्याचे उत्तेजन द्यावे व कोणी वेडेवाकडे कसेंही बोलो, त्याला संभाळून घ्यावे असा त्यांचा क्रम असे. त्यामुळे सभांना व व्याख्यानांना पुष्कळ मंडळी. जमत व वादविवादांना रंग येई. गोपाळरावजींकडे या दिवसांत शाळंतील तरुण मुलें जमण्याचा एक अड्डाच असे. कारण त्यांना तरुण मुलांच्या सहवासाची हौस फार. या जमणाऱ्या तरुण मंडळींत टिळक ( कै० ना. वा. टिळक), खरे, (रा० ब० गणेश नारायण खरे,) रिटायर्ड डे. ए. इन्स्पेक्टर, व रानडे-(कै० वामन बाळकृष्ण रानडे.