पान:लोकहितवादी.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुजराथींत ग्रंथरचना सोसायटीच्या कामांत ते विशेष लक्ष घालीत, व सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ते गुजराथींत ग्रंथरचनाही करीत असत. अनेक शास्त्रग्रंथांचे अवलोकन करून, व निरनिराळे आधार, प्रमाणे, यांचे विवेचन करून त्यांनी गुजराथीत " आगमप्रकाश" व " निगमप्रकाश" असे दोन ग्रंथ लिहिले. यांची मराठी रूपांतरही त्यांनीच केली आहेत. या पुस्तकांतून वेदवेदांगे यांनी सांगितलेल्या विहीत मार्गाचे व त्याचप्रमाणे मंत्रतंत्र, शक्तिमार्ग इत्यादी वाममार्गाचे वर्णन व विवेचन आहे. या ग्रंथांचा उल्लेख: पुढे योग्य ठिकाणी पुनः येईलच. गोपाळरावजींची अहमदाबाद येथील नोकरी, व्यवसाय यांची ही हकीगत थोडक्यांत दिली आहे. याखेरीज त्यांच्या खासगी अशा पुष्कळच लहान लहान गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. परोपकार हा त्यांचा देहस्वभावच बनला होता; तेव्हां या गोष्टी, बहुतेक परोपकाराच्याच असावयाच्या व आहेतही. त्या सांगावयाला जागा नाही, याला नाइलाज आहे. ____गोपाळरावांची बदली अहमदाबादेहून नाशकास सन १८७६ साली झाली. त्यावेळी तेथील लोकांकडून त्यांचा मोठा सत्कार झाला. जाणाऱ्या येणाऱ्या-त्यांतूनही विशेषतः येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला मेजवान्या, पानसुपाऱ्या, मानपत्रे वगैरे नेहमी थोडी फार मिळतातच. परंतु गोपाळरावजींच्या बाबतीत असा वरकरणी प्रकार नव्हता. त्यांचा निस्पृहपणा, व लोकोपयोगी कामांविषयी कळकळ या गुणांमुळे ते लोकांना खरोखरच प्रिय झालेले होते, व त्यामुळे त्यांच्या जाण्याचे त्यांना मनापासून वाईट वाटले. त्यांतल्यात्यांत ते बढतीच्या जागेवर जात होते एवढाच लोकांना संतोष होता. ____गोपाळरावजींच्या मृत्यूनंतर पुण्यास जी दुःखवट्याची सभा झाली त्या सभेपुढे भाषण करतांना रा० ब० लालशंकर उमियाशंकर यांनी