पान:लोकहितवादी.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कित्येक जुनेला चळवळींकडे गोया सर्व अवधीत र विस्तार वाह ४० लोकहितवादी. अखेरचा मसुदा करून पाठविला. या सर्व खटपटीला यश येऊन शेवटी दत्तक कायम झाला. गरीब श्रीमंत हा भेद गोपाळरावांनी कधी लक्षात आणला नाही. गरीब व विपत्तींत पडलेल्या, दुबळ्या व म्हणूनच फसलेल्या अशा अनेक लोकांची गा-हाणी त्यांच्या कानापर्यंत येत, व त्यांत तथ्य आहे असें आढळले तर पैसा-अडका, वकील, सल्लामसलत अशा कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने ते त्यांची सोय लावीत. अशी काही उदाहरणे त्यांच्या घरच्या पत्रांत टिपलेली सांपडतात. पण विस्तार वाढता म्हणून ती येथे दिली नाहीत. या सर्व अवधींत दक्षिणेकडील पुणे सातारा इकडल्या चळवळींकडे गोपाळरावांचे लक्ष नेहमीं असे. इकडचे कित्येक जुने स्नेही त्यांना खाजगी कामांत सल्लामसलत विचारीत व ती अशी त्यांजकडून मिळतही असे. श्री. विंचूरकर, अक्कलकोटचे भोसले, वाईचे शेखमिरे सरदार वगैरे घराण्यांतील खाजगी तंटेभांडणे व सरकारी कामें यांत कित्येकवेळा त्यांच्या मसलतीचा उपयोग झाला आहे असे दिसते. अहमदाबाद येथे प्रेमामाई इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. तिच्यामार्फत दरवर्षी व्याख्याने होत असतात. गोपाळरावांची या ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने झालेली आहेत. त्याचप्रमाणे तेथें गुजराथी-इंग्रजी असें " हितेच्छू” नांवाचे वर्तमानपत्र गोपाळरावांच्या प्रेरणेनेच निघाले व ते कित्येक वर्षेपर्यंत त्यांत स्वतः लेखही लिहीत. विशेषतः बडोद्यास मल्हाररावी चालू असतांना तिच्याविरुद्ध तेथे कोणाची ब्रही काढण्याची छाती नव्हती. पण तेथून प्रत्येक जुलमी कृत्याची इत्थंभूत हकीगत गोपाळरावजींस कळे, व त्या माहितीच्या आधाराने मल्हाररावांच्या जुलुमावर ते कडक टीका करीत; वगैरे हकीगत वर आलीच आहे. गुजराथ व्हनाक्युलर ट्रान्सलेशन