पान:लोकहितवादी.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तकाबद्दलची सल्ला. ३९ अधिकारी लेफ्टनंट फिनिकसाहेब व अहमदाबादचे सिव्हिलिअन युरोपियन अधिकारी यांचेमध्ये बेबनाव होऊन भानगड उपस्थीत झाली होती. व त्या वेळी गोपाळरावही आपल्या सहकारी अधिकाऱ्यांबरोबर तींत गुंतलेले होते. गोपाळरावांसारखा सच्छील माणूस विनाकारण गुंतला याबद्दल खंडेराव महाराजांना मनापासून वाईट वाटत होते. पुढे सुयोगानें खंडेराव व गोपाळराव यांची गांठ पडून महाराजांचा लोभ गोपाळरावांवर जडला; व ते कारभारांत पुष्कळ वेळां गोपाळरावांची मसलतही घेत. त्याचप्रमाणे खंडेराव व जमनाबाई या गुणी दंपत्याबद्दल गोपाळरावांनाही मोठा आदर वाटत असे. ते बडोद्यास वरचेवर जात व महाराजांचा पाहुणचार घेत. पुढें खंडेराव कैलासवासी झाले व जमनाबाई पुण्यास अज्ञातवासांत येऊन राहिल्या; आणि मल्हाररावांचा गायकवाडी कारभार बडोद्यास चाल झाला. त्यासंबंधानें हितेच्छू ' पत्रांत जोरदार लेख लिहून त्यांनी ही सर्व अंदाधुंदी बाहेर काढली. त्यांची बातमी नेहमी खरी पारखून घेतलेली असे व तिचा त्यांना उपयोग झाला हे सांगणे नको. ' ऐतिहासिक गोष्टी' या पुस्तकाच्या पहिल्या भागांत १९७१९८।१९९ ही टिपणे बडोदें संस्थानच्या या काही वर्षांच्या कारकीर्दीसंबंधाने लिहिली आहेत ती वाचकांनी पाहावीत म्हणजे त्यांच्या बातमीचा बिनचकपणा व व्यापकपणा किती असे हे वाचकांना दिसेल." यांनी ( खूषमरकन्यांनी) पांच वर्षे गोंधळ घातला. परंतु एकाचे हातूनही धडगत झाली नाही" हा गोपाळरावांनी दिलेला अभिप्राय अगदी मार्मीक आहे. या बेबंदशाहीचा शेवट झाल्यावर जमनाबाई राणीसाहेबांची आपल्याला दत्तक व्हावा ही खटपट चालू झाली. त्या कामी जुनी कागदपत्रे, तहनामे वगैरे चाळून बाईला मसलत देण्याचे काम गोपाळरावांनी केले व त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर कृष्णराव यांनी अर्जाचा