पान:लोकहितवादी.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. नये. पण ते गोपाळरावांचे चिरंजीव; तेव्हां संसर्गदोष तरी झाला असेलच अशी शंका कोणी काढली व ग्रामण्य पुन्हा रंगले. नौकागमन दोषार्ह आहे की नाही हा वादाचा मुख्य मुद्दा होता. त्या प्रकरणी, याच्या आधींच दोन चार वर्षे होळकर सरकार यांनी आपले एक ब्राह्मण वकील विलायतेस पाठविले होते त्या वेळी शंकराचार्यांपर्यंत जाऊन व निरनिराळ्या क्षेत्रांतील ब्राह्मणांचे मत घेऊन परवानगी आणविलेली होती. त्या वेळी धर्मगुरूंनी दिलेल्या निकालांतील महत्त्वाचा मुद्दा असा होता की:-हल्ली बदललेल्या काळांत परदेशगमन ही बाब रोजच्या व्यवहारांत आलेली आहे. शिवाय देशांतल्या देशांत तरी नौकागमनाचे प्रसंग वरचेवर पुष्कळांना येतात त्या वेळी कोणी ग्रामण्य करीत नाही. कोकणांतून ब्राह्मण मुंबईस येतात त्या वेळी कोणी बहिष्कार घालीत नाही. तेव्हां रूढी व युक्ती या दोन्ही गोष्टींचा विचार करून बहिष्कार आवश्यक नाही. तरी पण व्यवहारांत सुनालेकींच्या माहेरसासर इत्यादी दररोजच्या गोष्टींत त्रास होऊ लागला, त्याला गोपाळरावजी कंटाळले. शेवटी काशीहून ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र आणविले तेव्हां ही भानगड मिटलो. पुढील वर्षी पार्लमेंटरी कमिटी हिंदुस्थानच्या आर्थीक परिस्थितीची चौकशी करण्याकरितां नेमिली होती तिजपुढे साक्ष देण्याकरितां गोपाळरावांना सरकारने बोलाविले होते. पण या त्रासाला कंटाळून गोपाळराव गेले नाहीत. अहमदाबादच्या या एकंदर दहा वर्षांच्या अवधींत गोपाळरावांचा. बडोदें संस्थानाशी संबंध निरनिराळ्या प्रकारांनी आला. ते असिस्टंट जज्ज असतांना अगदी आरंभीच्या दिवसांत खंडेरावमहाराज अहमदाबादेस आले होते. त्या वेळी त्यांचेबरोबर रेसीडेन्सींतील गोरे