पान:लोकहितवादी.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आव्हान. ३७ विवाहप्रसंगी ते प्रत्यक्ष हजर नव्हते त्यामुळे त्यांजवर बहिष्कार घालणे त्यांनी नाकारिलें. इतकेंच नाही तर बडोद्यास त्यांच्यावर बहिष्कार पुकारून तेथील ब्राह्मणांनी सरदार मुजुमदार (गोपाळरावांचे जामात ) यांस त्यांत गुंतविले होते व मुलीचे माहेरसासर बंद करविले होते; त्याबद्दल रदबदली करून तेथील बहिष्कारही रद्द करविला. बडोद्याच्या या फेर ठरावाला पुढे शंकराचार्याची संमती मिळून गोपाळरावजींच्या मागला हा बहिष्कार सुटला. त्याचवेळी, ते विवाहप्रसंगी हजर राहिले नाहीत याबद्दल त्यांच्या मित्रमंडळींचाही त्यांच्यावर रोष झाला व कित्येकांनी हे बोलावयास तेवढे शूर अशी त्यांच्यावर टीकाही केली. या टीकेत तथ्य किती होते हे कळण्याला आज मार्ग नाही. परंतु येवढी गोष्ट खरी की, गोपाळरावांची मते तशीच कायम होती; व वेळ प्रसंग आला असतां ती ते उघडपणे बोलून दाखवीत. या बहिष्कारप्रकरणाच्या दिवसांत पुनर्विवाहाला अनुकूल असलेले श्रुतिस्मृतीचे आधार पुढे करून व पुनर्विवाहपक्षाच्या म्हणण्यात शास्त्राधार बाजूला ठेवला तरी व्यवहाराचा व युक्तीचा जेवढा भाग आहे त्याचे त्यांनी आधाराने प्रतिपक्षी यांस तीस प्रश्न टाकिले आहेत त्यांची उत्तरे देण्याविषयी त्यांस आव्हान केले आहे. हे एक बहिष्कारप्रकरण संपतें न संपते तोच गोपाळरावजींवर आणखी एक प्रकरण उपस्थीत झाले. ते असें. त्यांचे चिरंजीव कृष्णराव येथे बी. ए. ची परीक्षा पास होऊन व सरकारी शिप्यवत्ती मिळवून पुढील शिक्षणाकरीतां विलायतेस गेले व तेथे तीन वर्षे राहन बॅरिस्टर होऊन परत आले. कोकणस्थ ब्राह्मण जातींतले हे पहिले बॅरिस्टर होत; यांस भेटण्याकरितां गोपाळरावजी मुंबईस गेले होते. कृष्णराव अहमदाबादेस पोचल्यावर तेथे ते गोपाळरावांपासून वेगळे राहात असत, कारण आपल्यामुळे घरच्या इतर मंडळीस त्रास होऊ