पान:लोकहितवादी.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ लोकहितवादी. लिहिले. या पत्रावर सह्या करणाऱ्या मंडळींत गोपाळराव होते. हा विवाह मुंबईस Grant Road च्या बाजूस गवळी तलावाजवळ झाला.. त्यावेळी ठिकठिकाणची मंडळी मुद्दाम विवाहाकरितां व भोजनसमारंभाकरितां हजर होती. यावरून ग्रामण्याला सुरवात झाली. पुण्यांतील वेशा० सं० गणेशशास्त्री मालवणकर यांचेकडे या प्रकरणांतील पुढाकार असून त्यांची ठिकठिकाणी पत्रे जाऊन ब्राह्मणांच्या सभा भरूं लागल्या व आपल्या गांवीं अगर प्रांतांत ज्यांनी सह्या केल्या होत्या. त्यांजवर बहिष्कार पुकारला जाऊ लागला. वाई, नाशीक, अहमदाबाद, बडोदें, खुद्द मुंबई इत्यादी ठिकाणी सभा भरल्या व त्यांनी बहिप्कार पुकारला. त्या बहिष्कृत मंडळींत गोपाळरावांचे नांव होते. काहीं ठिकाणीं कांहीं समंजस ब्राह्मणमंडळी होती तेथे बहिष्कारवाद्यांची आलेली पत्रे पुढारी वैदिकांनी दाबून ठेवून गांवांत चळवळ पेटू दिली नाही. 'ऐतिहासिक गोष्टी' या पुस्तकाच्या दुसऱ्या भागांत अशा एका ठिकाणची माहिती दिली आहे. ती अशी:-मुंबईस प्रथम पुनर्विवाह झाला तेव्हां भटांनी आपले रोजगार पिकविण्याकरितां जिकडे तिकडे ग्रामण्ये उभी केली. या लोभी व दुष्ट भटांनी दूर दूरपर्यंत डांका पाठविल्या व थोतांडे उभी केली; परंतु ठाणे येथें ब्राह्मणांत प्रमुख भिकोबा जोशी (साष्टीकर) म्हणून आहेत त्यांनी आपले गांवीं पत्रे आली ती तशीच बांधून ठेऊन ग्रामण्य म्हणून होऊ दिले नाही व स्वस्थतेने व्यवहार चालविले. असे हे एकच गांव सर्व हिंदुस्थानांत आढळेल. याजवरून सूज्ञ लोक जेथे आहेत तेथे मूर्खानी कसेही व कितीही दुष्ट उद्योग केले तरी बंडाळी उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे इतर एकदोन ठिकाणी समजूतदार पुढारी मिळाले. त्यांतल्यात्यांत अहमदाबादेस असलेल्या गुजराथी व दक्षिणी ब्राह्मण मंडळींची गोपाळरावांवर फारच भक्ती होती. व निमंत्रणपत्रावर त्यांची सही असली तरी कामाच्या अडचणीमुळे