पान:लोकहितवादी.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. पुनर्विवाहाचा पुरस्कार. ३५ बक्षिसे द्यावीत. पुराणाभिमानी मंडळी पुन्हां खवळली व ग्रामण्याने पुन्हां डोके वर काढले.पुन्हां सभा झाली, तीत वेशा०सं० वैजापूरकर शास्त्री यांनी या मंडळीवर वेदनिंदा केल्याचा आरोप करून आपली कैफियत वाचण्यास सुरवात केली. परंतु याच सभेत बरीच शिकलेली व नव्या मताची मंडळी हजर होती असे दिसते. कारण शास्त्रीबुवा अर्ज वाचीत असतां मध्येच कोणीतरी दिवे मालविले व सभेत गोंधळ होऊन सभा मोडली. पुण्यास पुन्हां या प्रकरणी सभा झाली नाही. सभेत दंगा करण्याबद्दल पुणे येथील नव्या जुन्या तरुणांचा लौकीक त्यावेळेपासून आहे असे दिसते. अहमदाबादच्या ग्रामण्याचा विषय पुनर्विवाह हा होता. विधवांच्या दुःस्थितीबद्दल चळवळ, निदान वर्तमान पत्रांतून वगैरे विचार व लेखन, सुरू होऊन त्यावेळीही जवळ जवळ ३० वर्षे झाली होती. पुण्यास जाहीर रीतीने पुनर्विवाहाचा पुरस्कार करणारे गृहस्थ रा० विष्णूशास्त्री बापट या नांवाचे होते. पुढे विष्णू परशराम रानडे, विष्णूशास्त्री पंडित, कृष्णशास्त्री, गोपाळराव देशमूख, भांडारकर, रानडे, ही सर्वच मंडळी या मताचा पुरस्कार करू लागली. त्याचप्रमाणे मुंबई, गुजराथ या बाजूकडेही शिकलेल्या मंडळींत पुनर्विवाहमताचा पुरस्कार होत होताच. या मंडळींच्या व विशेषतः बंगाल्यांतील ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नेटाच्या खटपटीला यश येऊन अखेरीस विधवा विवाहाचा कायदा २५ जुलै १८५६ या दिवशी हिंदुस्थान सरकाराने पास केला. परंतु प्रत्यक्ष कृती घडून येऊ लागण्यास काही वर्षे वाट पहावी लागली. सन १८६९ साली पुनर्विवाहाला अनुकूल असलेल्या मंडळींनीं एक पुनर्विवाह घडवून आणिला व त्या निमित्तानें, खरोखर किती मंडळी अनुकूल प्रतिकूल आहेत, याची परीक्षा पाहण्याकरिता एक पत्र तयार करून ते निरनिराळ्या ठिकाणच्या पुढारी लोकांस