पान:लोकहितवादी.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. विशेष स्पष्टपणे लिहीत. सन १८६० सालच्या सुमारास जुनी संस्कृत पाठशाळा बंद होऊन इंग्रजी शिक्षण देणारे एक हायस्कूल व एक कॉलेज अशा दोन संस्था चालाव्या असें सरकारने ठरविले, त्यावेळी दक्षिणाफंडाची काय व्यवस्था करावी यासंबंधांत पुण्यातील गोपाळराव प्रभती सात मंडळींनी गव्हर्नरसाहेब यांचेकडे एक अर्ज करून अशी विनंती केली की; शास्त्री पुराणीक वगैरे मंडळींना उत्तेजन देण्याकरितां इतःपर खर्च न करितां देशी भाषांतून उपयोगी पुस्तकें लिहवून घेण्याकडे या रकमेचा विनियोग करावा. संस्कृत विद्या, निदान वैदीक पुराणीक ज्या प्रकारच्या विद्येला मान देतात तशा प्रकारची विद्या निरुपयोगी आहे अशा अर्थाचा मजकूर या अर्जात होता. यावरून ग्रामण्याच्या चळवळीला सुरवात झाली. तुळशीबागेत शहरांतोल सकळ ब्रह्मवृंदांची सभा भरून असे ठरले की; गोपाळराव प्रभृती अर्जदार मंडळींना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व त्यांजवर वेदपुराणांची निंदा केली म्हणून पतितत्वाचा आरोप ठेवून त्यांस बहिष्कृत करावें. पुढे गोपाळराव सभेस गेले असतां जमलेल्या मंडळींनी गिल्ला करून 'आमचा अर्ज परत द्यावा' अशा मजकुराच्या एका नवीन अर्जावर त्यांची व इतर मंडळींच्या सह्या घेतल्या. सभा संपतांच गोपाळराव घरी आले व दुसऱ्या अर्जावर आमच्या सह्या सक्तीने घेतल्या आहेत आमची मतें बदलली नाहीत, आमचे मत पूर्वीप्रमाणेच अजूनही कायमच आहे; अशा अर्थाचा तिसरा एक अर्ज त्यांनी गव्हर्नरसाहेबांकडे पाठवला. पण दुसरा व तिसरा हे अर्ज जाण्यापूर्वीच दक्षिणाफंडाचा विनियोग काय करावा याचा निकाल सरकारांत झाला होता. तो असा की, इंग्रजी शिक्षण देणाऱ्या कॉलेजांत या फंडातून शिष्यवृत्त्या (fellowships) द्याव्यात. व इतर विद्वान् मंडळीकडून देशी भाषांतून पुस्तके लिहवून घेऊन त्यांस