पान:लोकहितवादी.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रामण्ये. ३३ कोणती ते कोणासच सांगता येणार नाही. ....उपनिषदें व वेदान्त यांत ते प्रवीण होते. तथापी ते वेदान्ती नव्हते. वेदांत्याप्रमाणे त्यांची दृष्टी संसाराविषयी उदास मात्र झालेली नव्हती. प्रत्येक खऱ्या वेदांत्याची दृष्टी नेहमीं उदासच असते कां उदासपणाचे वरून सोंग आणि आंतून मैंदवत्ती असा प्रकार असतो कोणास ठाऊक ? –प्रत्येक मतवाद्यास असे वाटते की, गोपाळराव हे माझ्या मताचे आहेत. मात्र ते स्वतः रात्रौ निजण्यापूर्वी एकांतात जप करीत असत. पहांटे पंचपंच उषःकाली उठून प्रातःस्मरण करीत. या सर्व गोष्टी अहमदाबादेस असतांना मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. कारण हपीसाच्यावर लायब्ररीजवळ त्यांचे निद्रास्थान असे. व जवळच लायब्ररीचे दिवाणखान्यांत मला एक पलंगडी टाकून दिली होती तेथे मी निजत होतो. अहमदाबाद येथील दहा वर्षांच्या अवधीत ग्रामण्याचे प्रसंग गोपाळरावजींवर दोनदां आले. त्याचप्रमाणे त्याचेपूर्वी काही वर्षे पुण्यांतही त्यांजवर असा प्रसंग आला होता. त्यावेळचे सामाजीक सुधारणेचे प्रश्न कोणते, त्यांजकडे बघण्याची ता कालीन पिढीची दृष्टी कशी असे हे वाचकांना कळावे, म्हणून या दोन प्रकरणांसंबंधाने विस्ताराने लिहितो. पहिले, पुण्याचे प्रकरण अगदी क्षुल्लक कारणावरून निघाले होते. गोपाळराव वर्तमानपत्रांतून भटब्राह्मणांच्या चालीरीतींसंबंधाने कडक पत्रं लिहीत; हा त्यांचा क्रम सन १८४८ पासून सुरू होता. त्यावेळच्या शिकलल्या ब्राह्मण मंडळींत ते एकटेच अशा मताचे होते असे नाही. कृष्णशास्त्री चिपळूणकर, रा० ब० आण्णासाहेब भिडे, सोन्याबापू मांडे ही सर्व मंडळी त्यावेळी सुधारणेच्या मताला अनुकूल होती. व त्याप्रमाणे त्यांची वागणूकही असे. गोपाळरावजीत जे विशेष होते ते एवढेच की, ते वर्तमानपत्रांतून उघडपणे जुन्या चालीरीतींची चर्चा करीत व . लो....३