पान:लोकहितवादी.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. नंतर कथाकीर्तन, सभा-व्याख्याने वगैरे काहीं असेल तर तिकडे जात किंवा फिरावयास जात. घरी आल्यानंतर मुलांकडून रामरक्षा वगैरे स्तोत्रं म्हणून घेत व मग जेवीत.

  • एकंदरीत त्यांची घरची व लोकांतील वागणूक साधी असे. भेटावयास कोणी केव्हाही येवो; त्यांचा दरवाजा नेहमी मोकळा. पुष्कळ लोक येऊन आपली लहान लहान गा-हाणी देखील अशी सांगत बसत, की ऐकणारा असेल त्याला मनस्वी कंटाळा यावा. पण गोपाळराव कोणाचे म्हणणे ऐकून कंटाळले असें कधीं झालेच नाही. मात्र केव्हाही कोणीही जावो ते रिकामे असे दिसावयाचे नाहीत. जवळ काहीतरी वर्तमानपत्र पुस्तक वगैरे पडलेलें असे व फुरसतीप्रमाणे त्यांचे वाचन सतत सुरू असे. त्यांचा पोशाखही साधा व बालबोध वळणाचा असे. अंगरखा, पागोटें, धोतरजोडा ही सर्व साधीं असावयाची. व या पोशाखाच्या रीतींत त्यांनी कधीही बदल केला नाही. पुढे पेन्शन वगैरे घेतल्यानंतर ते घरीं सोप्यांत बसले असतांना गोष्टी निघून त्यांना कोणी विचारिलें कीं, दिल्लीदरबाला ( १८७७ साली) गेला होता त्यावेळी पोशाख कसा केला होता ? शेजारी असलेल्या खुंटीवरचे उपरणे ओढून अंगावर घेऊन ते म्हणाले, “ हा असा " अशी एक त्यांची गोष्ट सांगतात. यावरून त्यांच्या साध्या राहणीची थोडीशी कल्पना येईल.

या दिनचर्येची टिपणे गोपाळरावजींचे मित्र बळवंत मनोहर पंडित यांनी केली आहेत; त्यांपैकी एक खाली देतो.

  • " मला अहमदाबाद येथे असतांना जो त्यांचा सहवास घडला त्यावरून माझ्या मनाची अशी खात्री झाली आहे की, गोपाळराव हे श्रीमाणिकप्रभू यांच्यासारखे सकलमतस्थापक होते. ते वैष्णवाबरोबर वैष्णव, शैवाबरोबर शैव असे होते. त्यांची वास्तवीक उपासना