पान:लोकहितवादी.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिनचर्या व राहणी. नीटसे समजण्याकरितां त्यांची रोजची दिनचर्या काय होती, त्यांची व कुटुंबाची राहणी काय होती हे आतां सांगतो. ___* ते रोज प्रातःकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन प्रातःस्मरणाचे श्लोक म्हणत. नंतर मुंज झालेल्या मुलांकडून रुद्र, सौर, पवमान, पूजा, संध्या वगैरे ब्राह्मणांचे नित्यकर्म करावयास लावीत. नंतर बाहेर फिरावयास निघत. त्यावेळी पांचचार बाहेरची मंडळीही असावयाचीच. या मंडळीबरोबर बहुधा सामाजीक विषयांची चर्चा त्या वेळी चालत असे. फिरून आल्यावर कोणी भेटावयास वगैरे येत, त्यांची गांठ घेऊन कोणाचे काय म्हणणे आहे, ते सर्व शांतपणे ऐकून घेत. कोणी याचक, भिक्षूक, कोणी गा-हाणी घेऊन आलेले, कोणी औषधपाण्याकरितां, असे अनेक प्रकारचे लोक त्यांच्याकडे येत, त्या सर्वांशी ते सारख्या प्रेमळपणाने वागत व आपल्याकडून होईल तेवढे सहाय्यही करीत. मराठी पत्रव्यवहार, वर्तमानपत्रांकरितां वगैरे लेखलेखन, कदाचित् ग्रंथलेखनाचे कामही, यांतच सवडीप्रमाणे चालत असे.

  • गोपाळराव स्लान थंड पाण्याने करीत. घरी असतील ती मुलेंबाळे घेऊन साबरमती नदीवर स्वानास जावें, जातायेतां वाटेंत, गरीब, आजारी, पंगू वगैरे कोणी भेटले तर त्यांना धर्म करावा; स्नान झाल्यावर मोठ्याने मुलांसकट ब्रह्मकर्म करावे व नंतर देवदर्शन घेत घरी यावे हा नित्यक्रम असे. घरी आल्यावर पार्थिवाची पूजा करून अतिथी अभ्यागतासह ते भोजन करीत.
  • भोजनाचे वेळी गप्पागोष्टी, विशेषतः ऐतिहासीक गोष्टी ते नेहमी सांगत. पेशवाई जेवणाचा थाट वगैरेंचे मोठ्या रसभरीत रीती, वर्णन करीत; ते इतके की, ऐकणारांची हंसतां हंसतां मुरकुंडी बळत असे.
  • भोजनानंतर थोडेसें लेखन वगैरे करून ते कचेरीस जात. कचेरी